Vijay Sardesai | Goa Monsoon Assembly 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: टोमॅटो दरवाढ विधानसभेत! सरदेसाई म्हणाले मोफत वाटा, नाईक म्हणतात झळ नाही

राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी जनतेला टोमॅटो दराबाबत आश्वस्त केले आहे.

Pramod Yadav

Goa Assembly Monsoon Session 2023 Live Update

देशात सर्वत्र टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. प्रति किलो 150 रूपयांच्या जवळ टोमॅटोची विक्री होत आहे. गोव्यात देखील टोमॅटो दरवाढीचा फटका गोव्यातील जनतेला देखील बसत आहे. हाच प्रश्न फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आजपासून सुरू झालेल्या विधानसभा पावसाळी अधिवेशात उपस्थित केला. त्यावर राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक यांनी जनतेला टोमॅटो दराबाबत आश्वस्त केले आहे.

विजय सरदेसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात टोमॅटोच्या दराबाबत प्रश्न उपस्थित केला. 'टोमॅटोचे दर प्रति किलो 140 रुपये झालेत. हा दर सामान्य गोवेकरांच्या हाताबाहेर गेला आहे. आता सरकारनेच प्रत्येक गोवेकराला दोन किलो टोमॅटो मोफत देण्याची सोय करावी.' असे सरदेसाई म्हणाले.

याबाबत उत्तर देताना गोव्याला टोमॅटो दरवाढीचा फटका बसणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री रवी नाईक यांनी विधानसभेत दिली. 'फलोत्पादन खात्याकडून बाहेरुन टोमॅटो आणून गोव्यात कमी दराने विकले जात आहेत. त्यामुळे वाढीव दराचा फटका गोव्यातील जनतेला बसणार नाही. असे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले.

दोषींवर कारवाई होणारच

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याप्रकरणी स्पष्टीकरण देताना याप्रकरणी दोषींवर कारवाई होणारच अशी ग्वाही दिली. याबाबत बांधकाम खाते तपासणी करत आहे. तसेच, याची आयआयटी रुरकीच्या माध्यमातून तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बांधकाम मंत्री काब्राल देखील याबाबत श्वेतप्रत्रिका काढणार असल्याची माहिती यावेळी सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT