Drowning cases in goa last six years Dainik Gomantak
गोवा

समुद्रात पोहण्याचा मोह महागात, गोव्यात सहा वर्षात 118 पर्यटकांचा बुडून मृत्यू

सर्वात जास्त मृत्यू समुद्रात बुडून मृत्यू झाले आहेत.

Pramod Yadav

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. याबरोबरच समुद्रात पोहण्याचा मोह काही पर्यटकांना आवरत नाही. मात्र, हा मोह काही पर्यटकांच्या अंगलट आला आहे.

गोव्यात सहा वर्षांत तब्बल 118 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त मृत्यू समुद्रात बुडून मृत्यू झाले आहेत.

आमदार अॅलेक्स लॉरेन्स यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला होता. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या प्रश्नाला उत्तर दिले आहे. गोव्यात सहा वर्षात 118 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून, त्यापैकी 78 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे.

अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून समुद्रात पोहण्याचा आनंद घेतात मात्र, सुरक्षेच्या नियमांकडे लक्ष न दिल्यामुळे पर्यटकांना जीव गमवावा लागतो. समुद्र किनाऱ्यावर लावलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे पर्यटक दुर्लक्ष करतात आणि खोल समुद्रात उतरतात त्यामुळे जीव गमावतात. असे पर्यटनमंत्री खंवटे यांनी म्हटले आहे.

अपघाती मृत्यू अर्थसहाय्य योजनेंतर्गत 118 जणांच्या कुटुंबीयांना मदत

रस्ते अपघाती मृत्यू अर्थसहाय्य योजनेंतर्गत 118 जणांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे. 2020 सालापासून 118 जणांना प्रत्येकी दोन लाख रूपये मिळून 2.34 कोटी रूपये अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

यात निष्काळजी आणि बेफिकरीने वाहन चालवणे, स्वंय अपघात, झाड पडल्यामुळे, गुरांना धडक, इतर वाहनांना धडक अशा विविध अपघाताच्या घटनांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT