Pramod Yadav
मागील आठवड्यात मंगळवारपासून गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कला अकादमीच्या रंगमंचाचे छत कोसळण्यावरून गदारोळ झाला.
विरोधकांनी कला अकादमीच्या मुद्यावरून चर्चेची मागणी केली. यापूर्वी कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
मागील वर्षापासून गाजत असलेल्या म्हादई पाण्याचा मुद्दा यावेळी देखील अधिवेशनात गाजला.
विरोधकांनी म्हादईबाबत कर्नाटकचा मंजूर केलेला डिपीआर मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मागणी लावून धरली.
कला अकादमीच्या मुद्यावरून पेचात सापडलेले मंत्री गावडे यांनी अटल सेतूमध्ये देखील भ्रष्टाचार झाल्या वक्तव्य केले असा दावा विरोधकांनी केला.
अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कला अकादमी सोबत गावडे यांच्या कथित वक्तव्यावरून वादंग झाला.