Goa Monsoon Session 2023| Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: 'महागाई वाढली, आमदारांच्या वेतनवाढीचा विचार करा', दिगंबर कामतांची मागणी

नगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री सावंत यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon Session 2023: आमदारांना देण्यात येणाऱ्या वेतन लक्षात घेऊन त्यांना वाढ देण्याबाबत विचार करावा अशी मागणी आमदार दिगंबर कामत यांनी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली. नगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री सावंत यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. आता आमदारांनाही दिलासा द्यावा असे कामत (MLA Digambar Kamat) म्हणाले.

आमदार दिगंबर कामत म्हणाले, माझ्याकडे अनेक आमदारांनी वेतन आणि कर्जमर्यादेत वाढ करण्याची मागणी केली आहे. अधिवेशनात आमदारांच्या मागण्यांचा विचार व्हावा. वाढत्या महागाईमुळे इंधनासाठी मिळणारा अलाऊन्स देखील वाढवावा असे कामत सभागृहात बोलताना म्हणाले.

आमदारांना वाहन खरेदीसाठी कर्जमर्यादा 15 लाखांची आहे, त्यामध्ये वाढ करायला हवी. वाहनांचे दर वाढल्याने त्याबाबत विचार करावा असेही कामत म्हणाले. 2011-12 नंतर आमदारांचे वेतन, पेट्रोल आणि अन्य भत्ते वाढवण्यात आलेले नाहीत. सभागृहातील अनेक आमदारांनी मला याबाबत बोलण्यास सांगितले त्यामुळे सरकराने याचा विचार करावा. असे कामत म्हणाले.

आयआयटी सारख्या संस्थेला वारंवार विरोध होत असल्याने गोव्याबाबत देशात चुकीचा संदेश जात असल्याची खंत देखील कामत यांनी सभागृहात बोलून दाखवली. तुमच्या राज्यात काय सुरू आहे? IIT ला विरोध का होत आहे? असा प्रश्न आम्ही बाहेर गेल्यानंतर आम्हाला विचारला जातो. राज्याला शैक्षणिक हब बनवायचे असेल तर विरोध थांबला पाहिजे आणि सीएम सावंत यांनी यात लक्ष घालावे असे कामत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maharashtra Election Holiday: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानासाठी गोवा सरकारची भरपगारी सुट्टी; आदेश जारी

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार!

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

SCROLL FOR NEXT