Porvorim Accident
Porvorim AccidentDainik Gomantak

Porvorim Accident: दुचाकीची कारला मागून धडक, पर्वरीत 21 वर्षीय युवकाचा मृत्यू

युवकाला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Published on

Porvorim Accident: कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत 21 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. पर्वरीत बुधवारी (दि.19) दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात जखमी झाल्यानंतर युवकाला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नहिम बशीर भंडारी (वय 21, रा. हाळीवाडा- बिठठोण) असे या अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

नहिम त्याच्या ताब्यातील GA07-07-AE-8664 दुचाकीवरून जात असताना GA07-AF-5660 या कारला मागून धडकला. यात नहिम गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याला मृत घोषित करण्यात आले.

Porvorim Accident
'दारू घेऊन धबधब्यांवर जाऊ नका'; गोवा वन खात्याकडून नियमावली जाहीर, जाणून घ्या सविस्तर

पोलीस सहउपनिरीक्षक देवानंद काशीराम रेडकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com