Fish Curry And Rice In Government Canteen Dainik Gomantak
गोवा

Fish Curry And Rice In Government Canteen : राज्यातील सरकारी कॅन्टीनमध्ये 'फिश करी राईस' सक्तीचा

सरकारी कॅन्टीन स्वयंसाहाय्य गटांना मिळणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session 2023 : राज्यात सरकारी खात्यात चालणारे कॅन्टीन 1 सप्टेंबरपासून महिला बचत गटांना (स्वयंसाहाय्य गट) चालवण्यास देण्यात येतील आणि त्यात "फिश करी राईस "मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहातील दिली.

आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहात, राज्यात माशांचे दर वाढले आहेत, त्यामुळे सरकारी खात्याच्या कॅन्टीनमध्ये "फिश करी राईस" मिळत नाही. त्यामुळे ही कॅन्टीन स्वयंसाहाय्य गटाला चालवायला द्या आणि त्यात "फिश करी राईस" ठेवण्यास सक्ती करा. याबरोबरच स्वस्त दरात मासे विक्री सुरू करा, असा खाजगी ठराव मांडला होता. यावर मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कार्यरत आहे. या अंतर्गतच राज्यातील सरकारी कॅन्टीन 1 सप्टेंबरपासून महिला बचत गटांना चालवण्यास देण्यात येतील. 1 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यात 'फिश करी राईस' ठेवण्याचा आग्रह असेलच.

याबरोबरच सवलतीच्या दरात मासे उपलब्ध करून देण्यासाठी वर्षभरात कोल्ड चेन उभी केली जाईल. त्यामार्फत सवलतीच्या दरात मासे विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सध्या सरकारकडे अशा प्रकारच्या 9 गाड्या त असून त्या वाढवण्यात येतील, असेही ती मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT