Protected Heritage Sites In Goa: राज्यात 51 संरक्षित वारसास्थळे

नगरनियोजन मंत्र्यांची माहिती : भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची 21संरक्षित स्मारके
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Protected Heritage Sites In Goa भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची एकूण 21 संरक्षित स्मारके आणि पुरातत्व संचालकांच्या अखत्यारितील 51 संरक्षित वारसास्थळे गोव्यात आहेत. नगरनियोजन विभागाने या वारसा घटकांचा तपशील ठेवला असल्याचे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांना गुरुवारी विधानसभेत अतारांकित प्रश्न विचारला होता की नगरनियोजन विभाग गोव्यातील वारसा स्थळे आणि स्मारकांची नोंद ठेवतो का?

Vishwajit Rane
Goa Land Grabbing Cases: गेल्या साडेपाच वर्षात राज्यात जमिन हडपल्याप्रकरणी एकूण 76 गुन्हे दाखल

त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची एकूण २१ संरक्षित स्मारके केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात आणि ५१ संरक्षित वारसास्थळे गोव्याच्या पुरातत्व संचालनालयाच्या अंतर्गत येतात. गोव्यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अनेक इमारती, वारसास्थळे आहेत.

Vishwajit Rane
Black Rice Production in Valpoi: वाळपईत बालचमूंनी अनुभवली ‘काळ्या भाता’ची लावणी
Protected heritage sites
Protected heritage sitesDainik Gomantak

भारतीय गोवा पुरातत्व सर्वेक्षणाला रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीकडून शहापूर-फोंडा येथील पुरातत्व स्थळाजवळील बिगरगोमंतकीयांच्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांसंदर्भात एक याचिका प्राप्त झाली आहे.

त्यांनी त्या बेकायदेशीर झोपडपट्ट्या पाडण्याची मागणी केली आहे. बेकायदेशीर झोपडपट्ट्या आणि बांदोडा गाव झोपडपट्टीमुक्त करणे हे यामागचे त्यांचे ध्येय असल्याचे राणे यांनी आपल्या उत्तरात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com