Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

निवडणूक निकालांची भाकिते करण्यासाठी अहमहमिका

चौकाचौकांत खलबते; 10 मार्चकडे सर्वांच्या नजरा

दैनिक गोमन्तक

मडगाव : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यास सात दिवस उलटले आहेत, तर मतमोजणीसाठी 20 दिवस उरले आहेत. तरीही लोकांचा निवडणूक ज्वर अजून कमी झालेला दिसत नाही. या दिवसांत सर्वत्र दिसून येते ती चौकाचौकांत निवडणुकीच्या (Election) निकालांची केली जाणारी भाकिते व त्यात रंगलेली लहानथोर मंडळी.

कुणीही परिचयाचा भेटला, की पहिला प्रश्र्न केला जातो तो निवडणुकीच्या निकालाचा. तुमच्याकडे कोण निवडून येणार, अमका की, तमका? बाजारात, हॉटेलात, बसमध्ये वा अन्यत्र कुठेही हीच चर्चा सुरू असल्याचे दिसून येते.

तशातच राजकीय (Politics) पक्षांचे नेते, कार्यकर्ते वा समर्थक भेटले तर मग त्या चर्चेला मर्यादाच राहात नाही. मग ती चर्चा एका मतदासंघापुरती मर्यादित राहात नाही, तर राज्य स्तरावर पोचते. एक खरे की, मतदान आटोपल्यापासून बहुतेक उमेदवारांची कार्यालये जरी बंद झालेली असली तरी बहुतेकांनी एकंदर मतदानाचा आढावा मात्र जरूर घेतला आहे.

राज्याबाहेरील पक्षही चर्चेत

कोण निवडून येणार, कोण पराभूत होणार, एवढेच नाही तर कोणाचे सरकार (Government) सत्तेवर येणार, कोण मंत्री होणार, सरकारला कोणते अपक्ष वा पक्ष पाठिंबा देणार, असे अनेक तर्क-वितर्कही या चर्चेत येतात. या चर्चा ऐकणारा कित्येकदा चक्रावून जातो. ही चर्चा अखेर गोव्यात (goa) नव्याने आलेल्या तृणमूल कॉंग्रेस (TMC) पक्षावरही बऱ्याचदा घसरते, त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष, रिव्होल्युशनरी गोवन्समुळे कोणाला फटका बसणार, यावरही बराच खल होताना दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT