गोव्यात हिंदू संस्कृती जपण्यात छत्रपतींचा मोठा वाटा; मुख्यमंत्री सावंत

छत्रपतींमुळे कोळवाल किल्ला, बेतुल किल्ला आणि गोव्यातील अनेक मंदिरे अबाधित राहिली; प्रमोद सावंत
Chhatrapati Shivaji Maharaj played a major role in preserving Hindu culture in Goa; Chief Minister Sawant
Chhatrapati Shivaji Maharaj played a major role in preserving Hindu culture in Goa; Chief Minister Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात हिंदू संस्कृती जपण्यात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठी भूमिका बजावली आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज व्यक्त केले. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फोंडा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यासाठी गोवावासी त्यांचे ऋणी राहतील. त्यांच्यामुळे कोळवाल किल्ला, बेतुल किल्ला आणि गोव्यातील अनेक मंदिरे अबाधित राहिली,” असे सावंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजींने देशात हिंदू (Hindu) राज्याचा पाया घातला.

Chhatrapati Shivaji Maharaj played a major role in preserving Hindu culture in Goa; Chief Minister Sawant
'काँग्रेस फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न, कोट्यांवधींचे आमिष'

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (pramod-sawant) आणि इतरांनी आज (शनिवार) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना फर्मागुडी आणि फोंडा येथे आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मसोहळा साजरा झाला.

जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. याबाबत मोदी यांनी ट्वीट केले. ट्वीटमध्ये ते लिहितात “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणासाठीचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे .सत्य आणि न्याय या मूल्यांशी त्यांनी तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com