Goa Election Dainik Gomantak
गोवा

बंगालचे चक्रीवादळ गोव्यात धडकणार, राजकीय हवामान खात्याचा अंदाज

दैनिक गोमन्तक

गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू झाल्याने राज्याबाहेरीलही अनेक राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. यात तृणमूल कॉंग्रेस (TMC) आघाडीवर असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आज संध्याकाळी गोव्यात येत आहेत. आणि उद्या त्यांचे राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. आणि बॅनर्जी यांच्या गोव्यात येण्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.

गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत कितीतरी चक्रीवादळे येऊन गेलीत. सर्वसाधारणपणे ती पश्चिम बंगाल किंवा केरळकडून येतात, पण आता पश्चिम बंगालमधून जे राजकीय चक्रीवादळ आले आहे ते गोव्याचे संपूर्ण राजकारण नेस्तनाबूद करूनच शांत होणार आहे. मग त्यात शंभर वर्षांचे जुने झाड असो की हल्लीच कोंब फुटलेला कवाथा असो, सगळेच या सुसाट वाऱ्या धराशाही होणार.. हे सांगायला राजकीय हवामान खात्याची गरजच नाही.

गोव्‍यातील जो जुना वृक्ष आहे त्याच्या फांद्या तृणमूलच्या गवताला पेलवणार काय किंवा नारळाच्या झाडांना ही गवताची पाती आधार देणार का.. या प्रश्नाचे उत्तर मतदारच देतील. गोव्याला गिळंकृत करायला पन्नास दिवस खूप झाले, असे म्हणणे म्‍हणजे साडेचारशे वर्षे ज्यांनी हालअपेष्टा सहन केल्या त्यांचा एकाअर्थी अपमानच आहे. आम्ही तुमची जमीन एक लाखाच्या बदल्यात एक कोटी रुपये देऊन विकत घेतली तर इथले पंधरा लाख मतदार म्हणजे किस झाड की पत्ती... अशा आविर्भावात नवे राजकीय पक्ष हवा फिरवीत आहेत. आणि इथले मतदार दोन्ही होड्यांवर पाय ठेवून नदी पार करणार.

ज्‍येष्‍ठांना, महिलांना आम्ही सत्तेवर येताच तुमचे पगार वाढवणार, असे आमिष दाखवणे सुरू आहे. आणि आमचे मतदार अतिहुषार... पगार वाढणार म्हणून त्यांना मत देणार. पण, ते काही यायचेच नाहीत. येणारे सरकार त्यांना सरकारी पगार देणारच. मतदारांचे काहीच नुकसान नाही. असो. म्‍हजे गोंय, म्हजे गोंयकारपण म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या पक्षाची तृणमूलच्या वाऱ्यामुळे दुर्दशा झाली. जुन्या वृक्षाच्या कमजोर फांद्या ‘कोट्यवधी’ झुळकेतून धराशाही पडल्या. बरोबर जी काही लहान लहान झाडेझुडपे प्रत्येक तालुक्यात होती त्‍यांनीसुद्धा गवताला तोंड लावले. कोण कोणासाठी एवढी वर्षे एकनिष्ठ ते गोंयकारांना कळून चुकले असेलच.. ये तो शुरुवात है. अभी तो और तुफान आने बाकी है.

- श्रीकृष्ण केळकर, नानोडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa Today's News Live: अवजड वाहनांना अनमोड घाट खुला

Sahara Refund Cap: सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा, रिफंडबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

SCROLL FOR NEXT