Goa Assembly Election Daink Gomantak
गोवा

Goa Assembly Election: भाजपला स्वकीयांकडून धोका?

Goa: भाजपला धास्ती बंडखोरांची: गोवा फॉरवर्डही करतोय निवडणुकीसाठी तयारी

सुभाष महाले

काणकोण: काणकोणमधील सध्याचा राजकीय रागरंग बघितला, तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये खरी लढत होणार आहे. तर इतर विरोधी पक्षांनीही चांगल्यापैकी आव्हान देण्याची तयारी केली आहे. भाजपला या मतदारसंघात संधी असली तरी स्वपक्षातील बंडखोरीची झळ पक्षाच्या उमेदवाराला बसू शकते.गोवा फॉरवर्ड व काँग्रेसची युती होऊन काँग्रेसच्या पदरात हा मतदारसंघ पडल्यास कॉंग्रेस उमेदवाराला बळ मिळणार आहे. उपसभापती इजिदोर फर्नांडिस व माजी मंत्री रमेश तवडकर यांचा खास मतदार वर्ग या मतदारसंघात आहे. काँग्रेसचे जनार्दन भंडारी ‘जनसेना’च्या माध्यमातून सतत या मतदारसंघात प्रकाशझोतात आहेत. काँग्रेसचे दुसरे इच्छुक उमेदवार महादेव देसाई यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र पक्षाने अद्याप उमेदवार हे ठरवलेले नसल्याने दोघेही झोकून देऊन काम करीत आहेत. गोवा फॉरवर्डतर्फे प्रशांत नाईक रिंगणात उतरणार आहेत. रिव्होलुशनरी गोवन्सतर्फे प्रशांत पागी व आप पक्षातर्फे आगोंदचे रेमी बोर्जीस निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

Goa Assembly Election

काणकोण मतदारसंघात सर्वाधिक अनुसूचित जमातीचे मतदार गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळमध्‍ये आहेत. त्‍यामुळे मतदारांचा कल कोणाच्‍या बाजूने आहे. त्‍यावर तेथील मते मिळणार आहेत. तसेच अनेक उमेदवारांच्‍या दाव्‍यांमुळे व चालविलेल्‍या तयारीमुळे मत विभाजनाचा लाभ नक्की कुणाला होईल, हे आत्ताच सांगणे अवघड आहे.

ज्ञातीबांधवांचे लॉबिंग!

काणकोणात सध्या आपल्याच ज्ञातीतील नेत्याला उमेदवारी दिली जावी यासाठी काही जण लॉबिंग करू लागले आहेत. क्षत्रिय पागी समाजाचे 5500 मतदार आहेत. ख्रिश्चन समाजाचे 3800 , सारस्वत समाजाचे 3500, अनुसुचित जमातीचे 10 हजार, क्षत्रिय मराठा समाजाचे सुमारे 4800 मतदार आहेत.

MLA List

सद्यस्‍थितीतील राजकीय गणिते

आगामी विधानसभा निवडणुकीत उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. विजय पै खोत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल‌ करण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे आता इजिदोर फर्नांडिस व रमेश तवडकर हेच भाजप उमेदवारीचे दावेदार राहिले आहेत. उमेदवारीची माळ या पैकी कोणाच्या गळ्यात पडते, त्यावर पुढील राजकीय गणिते ठरणार आहेत. लढत चुरशीची होण्‍याची शक्यता आहे.

निष्ठावंताची साथ मिळणार काय?

इजिदोर यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याने त्यांच्याबाबत काँग्रेसमध्ये नाराजी आहे, पण निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांना कशी साथ मिळते यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यातच तवडकर यांनी यावेळी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न चालवले आहेत. एसटी समाजातील मतांवर यावेळी परिणाम होऊ नये म्हणून भाजप काय दक्षता घेते याकडे पाहावे लागेल. गत निवडणुकीत तवडकरांना डावलल्याने सांगे मतदारसंघात परिणाम झाला होता.

Elected Candidates

एक दृष्‍टिक्षेप

आजपर्यंत काणकोणातून रमेश तवडकर व वासू पायक गावकर हे अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडून आले. अल्प मतदार असलेल्या समाजातूनही आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये संजय बांदेकर, जगदीश आचार्य, विजय पै खोत, इजिदोर फर्नांडीस यांचा समावेश होतो. सर्वाधिक अनुसूचित जमातीचे मतदार गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळमध्‍ये आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार इजिदोर फर्नांडीस यांना 10,853 मते, तर विजय पै खोत यांना 8745 तर अपक्ष उमेदवार रमेश तवडकर यांना 7739 मते मिळाली होती. ‘आप’चे संदेश तेलेकर यांना 452, मगोचे गौरीश बांदेकर यांना 398 मते मिळाली होती.

महिला मतदार

मतदारसंघाची एकूण मतदार संख्या 33,949 आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. महिला मतदार 17,293 असून पुरूष मतदार 16,656 आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे कर्ते पुरुष परदेशात नोकरीनिमित्त असल्‍याने काहींची नोंदणी मतदार यादीत झाली नाही. सर्वाधिक 10,384 मतदार पालिका क्षेत्रात आहेत. त्या खालोखाल 5,799 मतदार पैंगीण पंचायत क्षेत्रात आहेत. गावडोंगरी व श्रीस्थळ सोडल्यास सर्व पंचायती व पालिका क्षेत्रात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. पैंगीण व काणकोणमधून अनेकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यात वासू गावकर, इजिदोर आणि तवडकर यांचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT