Goa Assembly Election: statment by Minister Michael Lobo

 
Dainik Gomantak
गोवा

राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे मित्र अथवा वैरी नसतात: मायकल लोबो

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होणे स्वाभाविकच..!

दैनिक गोमन्तक

कळंगुट : विधानसभा निवडणूक तोंडावर (Goa Assembly Election) आली असल्याने पक्षांतर होणे साहजिकच आहे. रोहन खंवटे, जयेश साळगावकर यांनी केलेले पक्षांतर ही सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, याबाबत मी अद्याप कुठलाच ठोस निर्णय घेतलेला नाही. मतदारांचा कौल आजमावण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे मंत्री मायकल लोबो (Michael lobo) यांनी सांगितले.

राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे मित्र अथवा वैरी नसतात. त्यामुळे खंवटे, साळगावकर आम्ही मित्रच आहोत, अशी पुस्तीही लोबो यांनी यावेळी जोडली. सिकेरी येथील आग्वाद किल्ला हा ऐतिहासिक वारसा असल्याने प्रत्येक गोमंतकीयाला या गोष्टीचा अभिमान आहे. त्यामुळे सरकारद्वारे नव्यानेच सुशोभीकरण केलेल्या किल्ल्याच्या देखभालीची जबाबदारी एका खासगी संस्थेकडे देण्यास माझा वैयक्तिक विरोध असल्याचे स्पष्ट मत लोबो यांनी व्यक्त केले.

या किल्ल्याची देखभाल करण्यासाठी या खासगी संस्थेने दरवर्षी एक कोटी वीस लाख रुपये सरकारला देण्याचे निश्चित झाले आहे. यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा थेट आरोप मंत्री लोबो यांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

किल्ल्यावर स्वातंत्र्य संग्रामातील युद्ध कैद्यांच्या स्मृती अबाधित आहेत. त्यामुळे त्यांचे कायमस्वरूपी जतन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किल्ल्यावरील नूतन प्रकल्पाचे गोवा मुक्तिदिनी उदघाटन होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मंत्री लोबो यांची भेट घेतली असता त्यांनी हे विधान केले.

अंतिम निर्णय जनताच घेणार

सध्या निवडणुका (Goa Assembly Election) तोंडावर आल्याने विविध राजकीय पक्ष स्थानिक राजकीय नेत्यांच्या संपर्कात आहेत. ज्या पद्धतीने रोहन ख़ंवटेंना भाजपने आपलेसे केले, त्याचप्रमाणे चर्चिल आणि त्यांची कन्या वालंका यांना तृणमूल कॉंग्रेसने (TMC). देशातील विविध राजकीय पक्ष तसेच स्थानिक पक्ष राजकीय नेत्यांशी संपर्क ठेवून आहेत. त्याचप्रमाणे माझ्याशीही अनेकांनी संपर्क साधला आहे. परंतु अंतिम निर्णय हा जनताच घेणार आहे. कळंगुटमधील जनतेचा कौल आजमावण्याचे काम सध्या सुरू आहे, असे मायकल लोबो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT