Congress Goa Forward Dainik Gomantak
गोवा

युतीवरून काँग्रेसमध्ये दुही; गोवा फॉरवर्डची भूमिका आज ठरणार

भाजपला हरविणे हे दोन्ही पक्षांचे उद्दिष्ट आहे, हे राव यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिनेश राव आणि दिगंबर कामत

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा फॉरवर्डशी (Goa Forward) अजून आमची युती झालेली नाही. त्यांनी फक्त आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि तो आम्ही स्वीकारला आहे. असे वक्तव्य काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केल्यानंतर युतीच्या शक्यतेवर काळे ढग निर्माण झाले होते. मात्र, अवघ्या एका तासातच काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना आम्ही बोलणी करण्यासाठी 11 तारखेला काँग्रेस कार्यालयात बोलावले आहे, असे ट्विट केले. यामुळे युतीवरून कॉंग्रेस (Congress) नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट होत आहे.

गोवा फॉरवर्डशी युती होणारच, असे संकेत राव यांनी आज सायंकाळी दिले. दिनेश राव यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना, विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही 11 तारखेला सकाळी १० वाजता काँग्रेस कार्यालयात त्यांना आमंत्रित केले आहे. त्यावेळी गोवा निवडणूक प्रमुख गिरीश चोडणकर व अन्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित असतील, असे ते म्हणाले.

चिदंबरम यांच्या वक्तव्याचा विपर्यास

चिदंबरम यांनी युती होणार नाही, असे म्हटले आहे त्याचे काय असे विचारले असता, चिदंबरम यांनी युती होणार नाही, असे कधीच म्हटलेले नाही. त्यांनी फक्त भाजपला गोव्यात हरविण्यासाठी गोवा फॉरवर्डने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही तो घेतला आहे, एवढेच म्हटले आहे. कदाचित या वक्तव्याचा बाकीच्यांनी वेगळा अर्थ काढला असेल, असे राव म्हणाले.

राहुल गांधींच्या बैठकीतील निर्णय अंतिम

युती होणार का? असे विचारले असता, गोव्यात भाजपला (BJP) हरविण्यासाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड एकत्र पुढे येणार, असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ठरले होते त्याप्रमाणेच होईल. भाजपला हरविणे हे दोन्ही पक्षांचे उद्दिष्ट आहे, हे राव यांनी स्पष्ट केले. नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिनेश राव आणि दिगंबर कामत उपस्थित होते. ही निवडणूक (Election) गोवा फॉरवर्डबरोबर युती करूनच लढवावी, अशी या दोन्ही नेत्यांची भूमिका असून त्यांनी कित्येकवेळा तसे बोलूनही दाखविले आहे, असे ते म्हणाले.

गोवा फॉरवर्डची भूमिका आज ठरणार

काँग्रेसने युतीच्या बोलणीसाठी आमंत्रण दिल्यावर गोवा फॉरवर्डच्या समितीची आज रात्री तातडीची बैठक झाली. काँग्रेसच्या या आमंत्रणावर यावेळी चर्चा झाली. मात्र, सगळेच सदस्य या बैठकीत हजर राहू न शकल्याने ही बैठक पुन्हा शुक्रवारी घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. ‘गोमन्तक’ने विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, या आमंत्रणावर विचारविमर्ष झाला. मात्र, काही सदस्य इतर कामांत व्यस्त असल्यामुळे सगळेच भेटू शकलो नाही. त्यामुळे ही बैठक शुक्रवारी घेण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. या बैठकीतील उपस्थितांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारावा, अशी सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रियांका गांधी दौऱ्याशी संबंध नाही : प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) शुक्रवारी गोव्यात येत आहेत. त्यामुळे आम्ही व्यस्त आहोत. त्याचसाठी ही चर्चा शनिवारी ठेवली आहे. मात्र, ही चर्चा आणि प्रियांका गांधी यांचा गोवा दौरा यांचा काहीही संबंध नसल्याचेही राव यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT