Dinesh Gundu Rao in goa
Dinesh Gundu Rao in goaDainik Gomantak

Goa Congress Politics पुन्हा चर्चेत: राष्ट्रवादी, फॉरवर्ड मात्र स्थितप्रज्ञ

काँग्रेसला झाली युती करण्याची घाई!
Published on

पणजी: गेल्या काही महिन्यांपासून कॉंग्रेसचे (Congress) नेते युतीबाबत बोलणे टाळत होते. मात्र बुधवारी त्यांचे प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी युतीचे संकेत दिले आहेत. समविचारी पक्षासोबत युती करण्याच्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे त्यांनी म्हटले खरे, परंतु गोवा फॉरवर्ड (Goa Forward) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या त्यांच्या संकेतांना फारसे महत्त्व दिले नाही.

‘आम्ही वारंवार भाजपशी लढण्यासाठी गोव्यात युती आवश्यक असल्याचा रेटा लावत होतो, तर तेव्हा काँग्रेसला त्याचे महत्त्व कळत नव्हते. आता तृणमूलच्या आगमनानतंर मात्र त्यांचे पाय जमिनीवर आले आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी ‘गोमन्तक’ ला दिली. विजय सरदेसाई यांनी उलट तृणूमल काँग्रेसच्या प्रशांत किशोर यांच्या गोव्यातील धडाडीचे कौतुक केले. दसऱ्यानंतर आम्ही युतीसंदर्भात काय तो विचार करू, असेही ते म्हणाले.

Dinesh Gundu Rao in goa
Goa Election: आवेर्तान फुर्तादो यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश,नावेलीतून लढणार

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गुंडू राव म्हणाले की, आम्ही कॉंग्रेसमध्ये आणखी फूट पडू नये यासाठी सतर्क आहोत. या निवडणुकीत आम्ही लोकांशी बांधिलकी जपणारा व विश्‍वासू उमेदवार उतरविणार आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबतच गोवा फॉरवर्डसोबतही युती करुन निवडणूका लढवण्यास आम्ही इच्छुक आहोत.

आम्ही 40 ही मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. सर्व मतदारसंघांत कॉंग्रेसला अनुकूल वातावरण आहे. असे सांगून कॉंग्रेसचे नेते युतीबाबत काहीच बोलण्यास तयार नव्हते. गोवा कॉग्रेसचे मुख्य निवडणूक निरीक्षक, माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी सुध्दा दोन्ही भेटीवेळी युतीबाबत काहीच सांगितले नव्हते. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते लुईझिन फालेरो यांनी कॉंग्रेस पक्षासोबतच आमदारकीचा राजीनामा दिला त्यामुळे हादरलेल्या कॉंग्रेसला युतीची गरज वाटू लागली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी कॉंग्रेसकडे प्रस्ताव ठेवले होते व युतीबाबत लवकर निर्णय घ्या, असे सांगून दोन ते तीन तारखाही दिल्या होत्या. गोवा फॉरवर्डने तर नाराज होऊन कॉंग्रेससोबत युतीची बोलणी स्थगित केली होती.

Dinesh Gundu Rao in goa
Goa: मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची बदली करण्याची कॉंग्रेसकडून होतेय मागणी

काल गुंडू राव यांच्या या वक्तव्याबाबत उशिरा सुचलेले शहाणपण अशी प्रतिक्रिया प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी दिली. विजय सरदेसाई यांनी समविचारी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र यावे, या आपल्या मंत्राचा जयघोष पुन्हा एकदा केला असला तरी त्यांनी आपल्या वक्तव्यात तृणमूल काँग्रेसच्या पवित्र्याचीही तारीफ केली आहे. तृणमूल काँग्रेसबरोबरच प्रशांत किशोर आहेत आणि ते राजकीय व्यूहरचनेत वाकबदार आहेत, असे म्हणताना हा पक्ष गोव्यात निश्चित काहीतरी कमाल करील, असे ते म्हणाले. गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नवीन घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवले असून ते परिस्थितीची चाचपणी करीत आहेत. याचा अर्थ काँग्रेस आणि तृणमूल या दोघांनाही त्यांनी समान अंतरावर ठेवून युतीसाठी ते आता दोघांच्याही शक्तीचा अंदाज घेऊ लागले आहेत, असे परिस्थितीचे अवलोकन करताना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com