Leander Paes Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election: लिएंडर पेसने गोव्यात जनसंपर्क मोहीमेेचा केला शुभारंभ!

मात्र दिल्ली गोव्याला आपल्या तालावर नाचवत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला होता.

दैनिक गोमन्तक

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर गोवा हे अत्यंत प्रभावशाली असे राज्य आहे. मात्र विकासाच्या नावावर फक्त सरकार लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील मच्छिमार बांधव अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र दिल्ली गोव्याला आपल्या तालावर नाचवत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.

माजी टेनिसपटू लिएंडर पेसने (Leander Paes) पुढील वर्षी गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) तयारी सुरु केली आहे. पणजीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीदरम्यान नुकतेच टीएमसीमध्ये सामील झालेला माजी टेनिसपटू लिएंडर पेसने गुरुवारपासून जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली. तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर पेसने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्याबाबतचा निर्णय त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर सोडला होता. तृणमूलने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गोव्यात प्रादेशिक पक्षांसोबत निवडणूक युती करणार असल्याचे ममता यांनी गोवा दौऱ्यात स्पष्ट केले होते.

लिअँडर पेस म्हणाला, मी निवडणूक लढवण्यास तयार आहे, परंतु ते ममता दीदींना ठरवू द्या. लिएंडर गोव्यात तृणमूलचा चेहरा असेल, असे मानले जात आहे. पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

गुरुवारी लिएंडर पेसने ट्विट केले, "माझ्या #NaveSakalichiBhasabhas मोहिमेची सुरुवात एम्बेलिम येथील स्वातंत्र्यसैनिक ज्युलियाओ मिनेझिस यांच्या घरी जाऊन आदरांजली वाहण्यासाठी आणि कोळीवड्डो डॉकयार्ड येथील मच्छिमारांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या आणि आकांक्षा ऐकून." खूप आनंद होत आहे. मला खरोखर आनंद वाटतो."

लिएंडर पेस गोव्यात टीएमसीचा चेहरा असू शकतो

टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर, 48 वर्षीय माजी टेनिस स्टारने सांगितले होते – “माझे ममता बॅनर्जी यांच्या सोबतचे नाते खूप जुने आहे. ममता दिदी खऱ्या चॅम्पियन आहेत. गोव्यातील जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, मी येथे सत्ता बळकावण्यासाठी आलेली नाही. संकटाच्या वेळी लोकांना मदत केली तर माझ्या मनाला शांती मिळते. मला भविष्यात गोव्याला मजबूत राज्य बनवायचे आहे. मला गोव्यात नवी पहाट पहायची आहे. गोवा निवडणुकीत लिएंडर पेस ममता बॅनर्जींचा चेहरा असू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: 'अनन्या'च्या जाळ्यात अडकला एसबीआय क्लर्क, फेसबुकवरची एक फ्रेंड रिक्वेस्ट अन् 92 लाखांचा गंडा; काय नेमकं प्रकरण?

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

SCROLL FOR NEXT