Goa Assembly Election Four Congress members resign from party

 

Dainik Gomantak

गोवा

गोवा फॉरवर्डशी युती काँग्रेसला चांगलीच भोवली..!

चार काँग्रेस सदस्यांनी दिला राजीनामा..

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती केली आहे, ती गोव्याच्या हिताची नाही, असा आरोप करून काँग्रेस पक्षात वर्षभरापूर्वी सामील झालेल्या डॉ. आशिष कामत, डॉम्निक नोरोन्हा, चार्ल्स डिसिल्वा आणि अनुप बोरकर या युनायटेड गोवन्स फाऊंडेशनच्या चार कार्यकर्त्यांनी काल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.(Goa Assembly Election )

विजय सरदेसाई (Vijay Sardesai) हे नगरनियोजन मंत्री असताना त्यांनी गोवा (Goa) विकायला काढला होता. 16 ब कलम आणून त्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनीचे रूपांतर करण्याचा घाट घातला होता. अशा व्यक्तीशी काँग्रेस (Congress) पक्षाने जवळीक साधणे, हे गोव्यासाठी धोक्याचे असून यामागे काँग्रेस नेत्यांचा स्वार्थ असल्याचा आरोप डॉ. कामत यांनी केला. डॉ. कामत हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते तर डॉम्निक नोरोन्हा हे काँग्रेस आरटीआय विभागाचे निमंत्रक होते. राजीनाम्याचा निर्णय घोषित करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला या दोन सदस्यांबरोबर चार्ल्स डिसिल्वा आणि झरिना डिकुन्हा हेही उपस्थित होते.

यावेळी डॉ. कामत म्हणाले, गोवा फॉरवर्डशी (Goa Forward) युती करण्याचे कारस्थान एप्रिल महिन्यातच शिजले होते. फातोर्डात काँग्रेस स्वबळावर लढणार का हे स्पष्ट करा, असे सांगूनही कार्यकर्त्यांना अंधारात ठेवले होते. गिरीश चोडणकर हे वरवर या युतीला विरोध असे दाखवत होते, पण तेही या कारस्थानात आतून सहभागी होते, असा आरोप कामत यांनी केला.

नोरोन्हा म्हणाले, काँग्रेस पक्ष भाजपला खोटा ठरविण्याबाबत गंभीर नाही. आरटीआय विभागाचा निमंत्रक म्हणून मी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कृती आराखडा सादर केला होता. मात्र, त्यासंबंधी त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही. कुठलाही निर्णय घेताना काँग्रेस सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT