<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election 2022</p></div>

Goa Assembly Election 2022

 

Dainik Gomantak 

गोवा

भाजपाने आर्लेकरना प्रवेश देत साधला डाव

Dainik Gomatntak

मोरजी: ज्या दिवशी पेडणे मतदारसंघाचे आमदार पर्यटनमंत्री झाले, त्या दिवसापासून कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी उघडपणे त्‍यांच्‍याविरोधात आव्‍हान दिले होते. पुढील निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) मनोहर (बाबू) आजगावकर यांचा किमान 10 हजार मतांच्या फरकाने पराभव करेन. तसेच त्‍यांच्‍याविरोधात आपला उमेदवार उभा करणार, असे आव्‍हान थेट दिले होते. मंत्री लोबो त्‍याचा पुनरुच्चार वेळोवेळी उघडपणे करायचे. मात्र, त्‍या दोघांमधील वाद एवढा चव्हाट्यावर येईल, असे वाटले नव्हते. त्‍या राजकीय डावपेचांचा प्रत्‍यय आता येऊ लागला आहे. लोबो यांनी बाबूंना ‘चेकमेट’ केल्‍याची चर्चा सध्‍या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy Chief Minister Babu Ajgaonkar) यांचा पराभव करण्यासाठी मायकल लोबो यांनी प्रवीण आर्लेकर यांच्या रूपाने पेडणे मतदारसंघात कार्य करण्यासाठी त्यांना पाठवले. बाबू आजगावकर यांचा डाव त्‍यांच्‍या अंगावर आणण्यासाठी आता आर्लेकर यांना भाजपात प्रवेश देऊन भाजपाने आपला डाव साधून घेतला. आर्लेकर आणि लोबो हे जिवलग मित्र. त्यामुळे दोन मित्र वेगवेगळ्या पक्षात कसे राहणार. त्यामुळे आर्लेकर यांनाही भाजपात (BJP) घेऊन बाबू यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न केला. आता त्‍यात काही प्रमाणात यश आले आहे. अर्धी लढाई जिंकली आहे. अजूनही बरेच काही असल्‍याचे संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी मगोची अधिकृत उमेदवारी घोषित झालेल्या प्रवीण आर्लेकर यांना हजारोंच्या उपस्थितीत 3 रोजी पेडणे येथे व्हायकाऊंट हायस्कूल मैदानावर भाजपात प्रवेश दिला. या प्रयत्‍नात कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. पक्षनिष्ठेपायी काल-परवापर्यंत ज्‍या उमेदवाराबरोबर प्रचार केला, तोच जर अन्‍य पक्षात गेला, तर काय करावे, अशा विचित्र परिस्‍थितीत कार्यकर्ते सापडले आहेत.

पुढे काय, उत्‍सुकता शिगेला...

उपमुख्यमंत्री आजगावकर ज्या पक्षात जातील, तिथे आम्ही आहोत, असे त्यांचे समर्थक आजही ठामपणे सांगत आहेत. या मतदारसंघात आजगावकर यांची किमान 7000 सात हजार मते वैयक्तिरित्या आहेत. त्या बळावर ते राजकीय चित्र पालटू शकतात, असा अंदाज त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. आता आजगावकर कोणती भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. लोबो यांच्‍याबरोबरचे वाद व डावपेच ते कसे पलटवून लावतात की चीतपट होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सुरवातीपासून गटाची फारकत

भाजपाचा एक गट सुरवातीपासून उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्या विरोधात होता. त्यातील काहीजण उघडपणे ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर यांना भाजपाची उमेदवारी देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी करीत होते. कोरगावकर यांना निष्ठावंत भाजपा नेत्यांनी आणि विद्यमान मंडळ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी देण्याची हमी दिली होती. तेच नेते ३ रोजी व्यासपीठावरून प्रवीण आर्लेकर यांचे गुणगान गात होते, हे चित्र पाहून काही नागरिक संभ्रमात पडले होते.

उघडपणे विरोध

भाजपा मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी उघडपणे उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्या विरोधात वातावरण तयार केले होते. अनेक बाबू समर्थक, सरपंच, उपसरपंच पंच आणि प्रतिष्ठीत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ‘मिशन फॉर लोकल’चे राजन कोरगावकर यांच्यासाठी कामाला लावले होते. आता गावस यांनी कोरगावकर यांची अचानक साथ सोडून आर्लेकर यांच्या हातात हात घालून त्याच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. हळूहळू निवडणुका जवळ येतील, त्यावेळी मात्र चित्र स्‍पष्‍ट होईल.

मुख्यमंत्र्यांचे आर्लेकर यांना आश्वासन

प्रवीण आर्लेकर यांना भाजपात प्रवेश दिल्यामुळे त्यांना निवडणुकीतही भाजपाची उमेदवारी मिळणार, याची हमी दिली आहे. त्यामुळेच आर्लेकर यांनी पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. त्यावेळी व्यासपीठावरून मुख्यमंत्री सावंत यांनी आर्लेकर यांना पक्षात योग्य ते पद दिले जाईल, अशी सावध भूमिका घेत आश्वासन दिले. तसेच उपमुख्यमंत्री आजगावकर यांनीही भाजपात राहावे, त्यांचा मान राखला जाईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांची सहानुभूती मिळवली. मात्र, उमेदवाराची हमी आर्लेकर यांनाच दिली आहे. सध्या त्‍याबाबत जाहीर केले नसले, तरीही पूर्वीचे भाजपा मंडळ पूर्णपणे आजगावकर यांच्या विरोधात कार्यरत होते. आजगावकर हे आजही भाजपाचे सदस्य आणि सरकारात उपमुख्यमंत्री असल्याने उमेदवारी त्यांना नाही, हे आताच जाहीर करू शकत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT