P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIADN
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
समुद्रात भारतीय नौदलाची ताकद वाढणार, बोईंग P-8I विमानाने गोव्यातील INS हंसावर आजपासून ऑपरेशन सुरू केले.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
अरबी समुद्रात पाळत ठेवण्यासाठी भारतीय नौदलाचे दुसरे स्क्वाड्रन 'P8I' विमान आता गोव्यात तैनात करण्यात येणार आहे. या स्क्वॉड्रनची दोन P8I विमाने मंगळवारी गोव्यातील नौदलाच्या INS हंस नौदल तळावर पोहोचली.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
मंगळवारी जेव्हा दोन्ही P8I विमाने गोव्यात पोहोचली तेव्हा भारतीय नौदलाच्या MiG29K लढाऊ विमानांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना INS हंस तळाच्या हवाई क्षेत्रात नेले.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
P8i हे लांब पल्ल्याचे मेरीटाइम पैट्रोल आणि रेनोकोसेंस एयरक्राफ्ट विमान आहे. अमेरिकेच्या P8I विमानांचा वापर पाळत ठेवण्यासाठी तसेच पाणबुडीविरोधी युद्धासाठी केला जातो. MiG29K लढाऊ विमाने ही रशियन विमाने आहेत.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
भारताने 2013 मध्ये अमेरिकेकडून आठ (08) P8I विमानांसाठी करार केला होता. अमेरिकेची बोइंग कंपनी ही विमाने बनवते. ही आठही विमाने तामिळनाडूच्या अरकोनम येथील आयएनएस रजाली नौदल तळावर तैनात आहेत आणि बंगालच्या उपसागरातून हिंदी महासागरावर बारीक नजर ठेवतात.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
एलएसी आणि आता पूर्व लडाखमध्ये चीनसोबत डोकलाम वाद सुरू असतानाही चीनच्या पीएलए सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी पी8आय विमान तैनात करण्यात आले होते.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
भारताने अमेरिकेसोबत चार अतिरिक्त P8I करार केले आहेत. ही चार विमाने आयएनएस हंस तळावर तैनात असतील.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
दुसऱ्या तुकडीची दोन विमाने आता गोव्यात कार्यरत झाली आहेत. उर्वरित दोन विमानही येथेच तैनात असतील. हे चार निमानं P8I नौदलाच्या 316 स्क्वॉड्रनचा भाग असतील.
P-8Is of Indian Navy commenced operations from INS Hansa Goa
Twitter/@NewsIAN
भारतीय नौदलाचे प्रवक्ते, कमांडर विवेक मधवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चार विमाने स्वदेशी उपकरणे आणि उड्डाण हेरगिरी चाचण्यांनंतर नौदलात सामील करण्यात आली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.