Ministers from Delhi offered flowers to Goddess Lairai of Shirgaon (Goa Assembly Election 2022) Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Election 2022: गोमंतकीय 'आप' ला स्विकारतील

दिल्लीतील मंत्र्यांनी घेतले शिरगावच्या लईराईचे दर्शन (Goa Assembly Election 2022)

Tukaram Sawant

Bicholim: गोव्यात आम आदमी पक्ष (AAP) सत्तेवर आल्यास गोव्यातही दिल्ली 'मॉडेल' (Delhi Model) राबविण्यात येईल. अशी ग्वाही 'आप' चे नेते आणि दिल्ली सरकारमधील समाज कल्याण खात्याचे मंत्री राजेंद्रपाल गौतम (AAP Leader & Delhi Minister Rajendrapal Gautam) यांनी शिरगाव-डिचोली (Shirgaon - Bicholim) येथे बोलताना दिली आहे. दिल्लीच्या धर्तीवर गोमंतकीयांना मोफत वीज (Free Electricity) देण्याची 'आप'ने घोषणा केल्यानेच आता मोफत पाणी देण्याची (Free Water) घोषणा करणे गोवा सरकारला (Goa Govt) भाग पडले आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. गोव्यात 'आप' ला उज्वल भवितव्य असून, गोमंतकीय जनता या पक्षाला नक्कीच स्विकारतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Goa Assembly Election 2022)

मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी शुक्रवारी शिरगाव गावात भेट देवून लाखो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या देवी श्री लईराई देवीचे दर्शन घेवून श्रींचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कालच 'आप'मध्ये प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर हे होते. मंत्री श्री. गौतम यांनी श्री लईराई देवस्थानबद्दल माहितीही जाणून घेतली. देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर मंत्री श्री. गौतम यांनी त्याठिकाणी उवस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी औपचारिक संवाद साधला. दरम्यान, दिल्लीला जाण्याच्या लगबगीमुळे मंत्री श्री. राजेंद्रपाल गौतम कुडणे येथील कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. असे उपेंद्र गावकर यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT