Deviya Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी सौरऊर्जेवरील फेन्सिंग उभारा; डॉ. दिव्या राणे यांची मागणी

MLA Deviya Rane: राज्यभरात मागील काळात वनाला आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या, तेव्हा या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केले.

Manish Jadhav

वन खात्यात 10 ते 15 वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. त्याचप्रमाणे वन्यप्राणी मानवी वस्तीपर्यंत येऊ नयेत, यासाठी सौरऊर्जेवरील फेन्सिंगची उभारणी करावी, त्यासाठी वनमंत्री व मुख्यमंत्र्यांनी वन खात्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत केली.

दरम्यान, राज्यभरात मागील काळात वनाला आगी लागण्याच्या घटना घडल्या होत्या, तेव्हा या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केले. विविध राज्यांतून आलेले हे कर्मचारी विविध ठिकाणी काम करीत आहेत. हा वर्ग एवढे काम करीत असतो, तरीही अनेक वर्षांपासून त्यांचे वेतन एकच आहे. त्यांची नोकरी तात्पुरती सुरक्षित करावी, त्यानंतर शक्य असल्यास त्यांना कायम करावे, अशी मागणी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केली.

रिसर्च ऑफ डेव्हल्पमेंट सायन्टिफिक मॅनेजमेंट दी फॉरेस्ट वाईल्ड लाईफ या संस्थेने आता वन खाते, क्लायमेंट चेंज, इको सिस्टिम, इकॉलॉजिकल मॅनेजमेंट, फॉरेस्ट रिसर्च, जेनेरेटिक रिसोर्स मॅनेजमेंट यांचाही अभ्यास करावा. या विभागाने राज्यातील वनांच्या संरक्षणाच्या दृष्टीने संशोधन करावे, अशी मागणीही आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केली.

प्राण्यांबाबत संशोधन करावे

गवे, रानडुकर हे लोकांच्या घरात, शेतात घुसतात त्याची कारणे शोधली पाहिजेत. त्यांची अन्नसाखळी तुटली आहे का, त्यांच्यासाठी कोणत्या पद्धतीचे अन्न पुरवता येईल यादृष्टीने संशोधन करावे. सत्तरी (Sattari) भागातील कृषी क्षेत्रात गवे व रानडुक्कर मोठ्या प्रमाणात येत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. त्याशिवाय माकड, वानरही मोठ्या प्रमाणात सुपारी, नारळ व इतर फळबागा नष्ट करीत आहेत, असे आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SIR Campaign In Goa: गोव्यात 'एसआयआर' मोहिमेला सुरुवात, बूथ लेव्हल अधिकारी करणार डोर-टू-डोर सर्व्हे; डॉक्युमेंट तयार ठेवण्याचे मतदारांना आवाहन

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT