CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोव्यात चार वर्षात 149 सराईत गुन्हेगारांची नोंद; आलेमाव यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

CM Pramod Sawant: राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम वेगाने सुरु आहे.

Manish Jadhav

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम वेगाने सुरु आहे. 2020 पासून 15 जून 2024 पर्यंत 55 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रिया सुरु केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात सांगितले. याशिवाय, वरील कालावधीत राज्यात 149 सराईत गुन्हेगारांची नोंद करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अतारांकित प्रश्नाद्वारे सरकारला सराईत गुन्हेगारासंबंधीची माहिती मागितली होती. आलेमाव यांनी 2020 ते 15 जून 2024 या कालाधीत राज्यात किती सराईत गुन्हेगारावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारकडून सविस्तर देण्यात यावी अशी असा प्रश्न केला होता. याशिवाय, किती गुन्हेगारांना राज्यातून तडीपार करण्यात आले यासंबंधीही माहिती सरकारकडे मागितली होती.

आलेमाव यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मडगाव पोलिस स्थानकामध्ये सर्वाधिक 19 सराईत गुन्हेगाराची नोंद झाली. मडगावनंतर वास्को पोलिस स्थानकात 14, कळंगुट 12, मायणा कुडतरी आणि वेर्णा प्रत्येकी 10, म्हापसा आणि वाळपाई प्रत्येकी 8, फोंडा 7, कोलवा आणि कुंकळ्ळी प्रत्येकी 6, डिचोली आणि फातोर्डा प्रत्येकी 5, जुने गोवा आणि केपे प्रत्येकी 4, पणजी, मुरगाव, पेडणे, मांद्रे, काणकोण प्रत्येकी 3, म्हार्दोळ, कुळे, कुडचडे, हणजूण प्रत्येकी 2, आगशी, पर्वरी, सांगे, पोलीस स्थानकांत प्रत्येकी 1. अशा 149 गुन्हेगारांची नोंद झाली. तर यापैकी 55 गुन्हेगारांवर तडीपार करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोव्यात गुंडाराज चालू देणार नाही'; रामा काणकोणकरांच्या न्यायासाठी विजय सरदेसाईंचे आझाद मैदानात आंदोलन

Vasco: वास्कोतील कचरा पाठवणार काकोड्यात! मुरगाव पालिकेचा निर्णय; सरकारला करणार विशेष अनुदानाची विनंती

Omkar Elephant: ‘ओंकार’चा तोरसे, तांबोसेत धुमाकूळ ! लोकांच्या जमावामुळे गोंधळ; कामात अडथळा आणल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा

Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

Goa Live Updates: महिला पर्यटकाला मनस्ताप देणाऱ्या 3 टॅक्सीवाल्यांना अटक

SCROLL FOR NEXT