Goa Assembly: अपघात कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपायोजना; मुख्‍यमंत्री सावंत

Pramod Sawant: काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधण्याचाही समावेश असल्याची माहिती
Pramod Sawant: काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधण्याचाही समावेश असल्याची माहिती
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार तातडीने दीर्घकालीन अशा उपायोजना करत आहे. त्यात काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधण्याचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी याविषयी प्रश्न विचारला होता.

शेट्ये म्हणाले, रस्तेअपघात कमी करण्यासाठी सरकारने रस्ते अभियांत्रिकीविषयी २९ जुलै २०२१ रोजी समिती नेमली होती. त्या समितीच्या आजवर किती बैठका झाल्या? निदान शेवटच्या दोन बैठकांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती सरकारने द्यावी.

या समितीच्या शिफारशींमुळे अपघातप्रवण अशी एखादी जागा सुरक्षित झाली याचे एखादे उदाहरण सरकारने सांगावे. सरकार या समितीच्या कार्याविषयी गंभीर आहे का?

त्‍यावर मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने या समितीच्या शिफारशींनंतर अपघात कमी करण्यासाठी जनतेची मते जनसुनावणीद्वारे जाणून घेतली होती. गेल्या वर्षी १६ जून रोजी या समितीची शेवटची बैठक झाली होती. समितीने सुचवलेल्या शिफारशींवर काम करण्यात येते.

Pramod Sawant: काही ठिकाणी नव्याने रस्ते बांधण्याचाही समावेश असल्याची माहिती
Goa Assembly: ‘दाबोळी’च्या पंखांमध्ये भरणार बळ; मुख्यमंत्री सावंत

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

अपघातप्रवण क्षेत्रे कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कामांचा तिमाही पद्धतीने आढावा घेण्यात येतो. फलक लावणे, गतिरोधक घालणे, रस्तारुंदीकरण करणे ही कामे तातडीने करण्‍यात येतात. तर, धोकादायक वळणे कापून काढणे, पर्यायी रस्ता करणे आदी दीर्घकालीन उपाययोजना असतात. या दोहोंच्या मदतीने अपघात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com