Smriti Irani | Silly Souls Bar And Restaurant  Dainik Gomantak
गोवा

Goa Silly Souls Cafe And Bar प्रकरणी इराणी कुटुंबीयांच्या बचावासाठी अबकारी कायद्यात दुरुस्ती!

Smriti Irani: मद्यविक्री परवान्यासंदर्भात अबकारी आयुक्त 18 रोजी निर्णय देणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Smriti Irani: वादग्रस्त 'सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार' (Silly Souls Cafe And Bar) प्रकरणाला कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी अबकारी खात्याने घाईघाईने कायद्यात दुरुस्ती केल्याचा आरोप ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केला आहे.

बेकायदेशीर मद्यविक्री परवान्याद्वारे केंद्रीयमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कुटुंबीयांकडून आसगाव येथे कथित सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार चालवल्याचे उघडकीस येऊनही ही दुरुस्ती त्यांच्या बचावासाठी केल्याचे रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे. मद्यविक्री परवान्यासंदर्भात अबकारी आयुक्त 18 रोजी निर्णय देणार आहेत.

अबकारी खात्याने 10 ऑक्टोबर रोजी अबकारी कायद्यात दुरुस्ती करणारी अधिसूचना काढली. या दुरुस्तीनुसार मद्यविक्रीचा परवाना एखाद्याच्या नावावर असला, तरी त्याच्या नावाने इतर व्यक्ती मद्यविक्री व्यवसाय करू शकते. मात्र, त्यासाठी परवाना शुल्काच्या 20 टक्के जादा रक्कम मोजावी लागणार आहे. ही दुरुस्ती लोकाहितार्थ नाही.

सामान्यांसाठी दुरुस्ती केली असती का?

अबकारी कायदा 1964 च्या कलम 104 (1) मद्यविक्रीचा परवाना हा वैयक्तिक एका व्यक्तीच्या नावाने देण्यात येतो व तो दुसऱ्याला हस्तांतर करता येत नाही. कायद्यातील नियमात बदल करण्यासाठी दुरुस्ती करणे हे कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे नव्याने केलेली दुरुस्ती नियमबाह्य आहे. एखाद्या सामान्य नागरिकाने जर दुरुस्तीची मागणी केली असती तर त्याची सरकारने दखलही घेतली नसती, असे ॲड. रॉड्रिग्स म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT