Goa House Demolition Case: विनाकारण अटक न करता प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
Goa Asgaon House Demolition Case Dainik Gomantak
गोवा

Asgaon Goa: पूजा शर्मा यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही; आगरवाडेकरांच्या वकिलांकडून पाठराखण

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव घरफोडी प्रकरणात आगरवाडेकर कुटुंबीयांकडून या घटनेच्या सातव्या दिवशी घुमजाव करण्यात आले असून संशयित पूजा शर्मा हिचा घर मोडतोड प्रकरणात हात नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

यासंदर्भात सरकारी तपास यंत्रणांनी या घटनेशी थेट संबंध नसलेल्या पूजा शर्मा यांना विनाकारण अटक न करता सखोल चौकशी करूनच प्रकरणाच्या मुळाशी जाणे योग्य ठरेल, असे आगरवाडेकर यांच्या वतीने त्यांचे वकील प्रसाद देसाई यांनी शुक्रवारी आसगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी प्रदीप आगरवाडेकर यांच्या पत्नी प्रिंशा आगरवाडेकर तसेच त्यांच्या मुली उपस्थित होत्या.

विजय सरदेसाई यांचा काडीमात्र संबंध नाही!

गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नसून त्यांचे केवळ आभार मानण्यासाठी पणजीत मी स्वत:हून त्यांची भेट घेतली होती, असे प्रिंशा आगरवाडेकर म्हणाल्या. पूजा शर्माविरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याचा निर्णय मी सरदेसाई यांच्या भेटीनंतरच घेतला हा केवळ योगायोग होता, असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: आक्रमक पवित्र्यामुळे ‘मोपा’वरील टॅक्सी पार्किंग दरवाढ मागे

Venzy Viegas: महिलेला मारहाणीसह मानहानी करणाऱ्या PSI च्या निलंबनाची वेन्झीची मागणी

CRZ Goa: पर्यावरणमंत्र्यांच्‍याच जागेत ‘सीआरझेड’चे उल्‍लंघन करून बांधकाम; करमणेतील स्‍थानिकांचा दावा

Valpoi News: ताडपत्रीच्या आधारावर भरतो बाजार, सर्वत्र खड्डेच खड्डे, रस्त्यांवर सांडपाणी

Bajaj CNG Bike: बजाजने दाखवली पहिल्या CNG बाईकची झलक; नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जुलैला होणार लाँच!

SCROLL FOR NEXT