वाळपई : सत्तरी तालुक्याला विविध कलांचा वारसा लाभलेला आहे. अनेकांनी संगीत कलेत कीर्ती गाठत सत्तरीचे नाव सर्वदूर पोहचविले आहे. असेच एक अष्टपैलू तबला वादक वाळपई येथून सहा किमी अंतरावरील बाराजण सत्तरी येथे राहणारे ज्ञानेश्वर नाईक यांनी सत्तरीच नव्हे तर राज्यभरात नाव लौकिक मिळवला आहे.
ज्ञानेश्वर यांच्या घराला संगीताचा वारसा लाभला आहे. त्यामुळे बालपणापासूनच संगीत कलेत त्यांना प्रचंड आवड निर्माण झाली. ज्ञानेश्वर यांचे वडील शंकर नाईक हे हार्मोनियम वादक होते. तसेच काका कै. यशवंत नाईक तबला वाजवायचे. त्यांच्या कडून ज्ञानेश्वर यांनी प्राथमिक तबल्याचे शिक्षण घेतले. नंतर कै. दत्ताराम वळपईकर यांच्याकडे सलग पाच वर्षे तबला वादन ते शिकले होते.
त्यानंतर पणजीत कला अकादमीत कै. मारुती कुर्डीकर यांच्याकडे सलग १९ वर्षे शास्त्रीय तबला वादनाचे धडे घेऊन कला अकादमीची ‘संगीत कुशल’ ही पदवी प्राप्त केली. गांधर्व महाविद्यालयाची विशारद पदवी प्राप्त केली आहे. ४६ वर्षात कीर्तनकारांना साथसंगत, सांगितिक कार्यक्रम संमेलनात साथ संगत केली आहे.
सध्या आपण वाळपई येथे तबला संगीत वर्गातर्फे मुलांना तबला शिकवित आहे. सत्तरी तालुक्यात चांगले तबला वादक घडले पाहिजेत.यासाठी आपला प्रयत्न आहे. कारण सत्तरी तालुक्याच्या भूमीला महान क्रांतीकारी इतिहास आहे. तसाच संगीत क्षेत्रातही सत्तरीने नाव लौकीक मिळविला आहे. संगीत क्षेत्रात तळपणारे चांगले तबलापटू भविष्यात निर्माण व्हावेत.
-ज्ञानेश्वर नाईक, तबलापटू
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.