Amar Shet Dainik Gomantak
गोवा

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Amar Shet Wins National Shilp Guru Award: गोव्यातील पारंपरिक कुंभारकाम आणि मातीकलेने राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील पारंपरिक कुंभारकाम आणि मातीकलेने राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मये येथील सुपुत्र आणि प्रख्यात कारागीर अमर शेट यांना टेराकोटा आणि मातीकलेतील उत्कृष्ट कारागिरीसाठी केंद्र सरकारच्या वतीने मानाचा ‘राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

‘कुंभारकाम, सिरॅमिक्स आणि टेराकोटा’ या श्रेणीत अमर शेट यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे अमर शेट हे गोव्यातील पहिलेच कारागीर ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे गोव्याच्या हस्तकला क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेला आहे.

अमर शेट यांच्या या यशाबद्दल गोव्यातील कलाप्रेमी, स्थानिक कारागीर, हस्तकला क्षेत्रातील मान्यवर आणि विविध स्तरांतील व्यक्तींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गोमंतकीय पारंपरिक हस्तकलेच्या संवर्धनाच्या दृष्टीने हा क्षण अत्यंत अभिमानास्पद मानला जात आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण

अमर शेट यांना हा पुरस्कार ९ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. पारंपरिक कलेला नावीन्याची जोड देत त्यांनी साकारलेल्या कलाकृतींमधून गोव्याच्या समृद्ध संस्कृतीचा ठसा राष्ट्रीय पातळीवर उमटला आहे. त्यांच्या या निवडीमुळे गोव्याच्या पारंपरिक कुंभारकामाला आणि मातीच्या कलाकृतींना देशपातळीवर मोठी प्रतिष्ठा लाभली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

SCROLL FOR NEXT