Govind Gaude corruption allegation X
गोवा

Govind Gaude: गोविंद गावडेंना मंत्रिपदावरुन डच्चू, दिल्लीत झाला निर्णय; पण मुख्यमंत्री म्हणतात, 'संदेश अजून आला नाही'

Goa Politics: नेत्यांबरोबर जरूर चर्चा केली; परंतु अद्याप कसलाही सुस्पष्ट संदेश देण्यात आला नसल्याची भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी 'गोमन्तक'ला माहिती.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करण्याबाबतचा निर्णय दिल्लीत झाला असला तरी तो कधी होणार, याची शाश्वती गोव्यातील भाजप नेतृत्वाला नाही. हा चेंडू दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या बाजूने सरकवल्यानंतर आता दिल्लीहून निर्णय येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सरकारात काहीशी चलबिचलता निर्माण झाली असून, प्रशासनही खोळंबलेले आहे.

'पक्षश्रेष्ठींकडे चर्चेची वाट पाहत सध्या भाजप अध्यक्ष दामू नाईक दिल्लीत खोळंबलेले आहेत. दामू नाईक यांनी गेली दोन दिवस संघटनेतील काही नेत्यांबरोबर जरूर चर्चा केली; परंतु त्यांना अद्याप कसलाही सुस्पष्ट संदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे ते दिल्लीत बसून आहेत', अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी आज 'गोमन्तक'ला दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला दिल्लीहून कसलाही संदेश आलेला नाही, असे ते म्हणाले.

'टाईम्स ऑफ इंडिया'ने आज गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार असल्याचे वृत्त दिले आहे. त्यामुळे सकाळपासून या राजकीय घडामोडींकडे पत्रकारांचेही लक्ष लागून राहिले होते. गोव्यातील प्रसार माध्यमे या गोष्टीवर गेली चार दिवस खल करीत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावडे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे सूतोवाच केले. त्याचा प्रतिकार म्हणून गावडे यांनी गेले काही दिवस जोरदार मोर्चेबांधणी चालवली आहे.

दरम्यान, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची शांतपणे वाट पाहण्याशिवाय भाजप नेतृत्वाकडे दुसरा पर्याय नाही. गावडे यांना काढून टाकण्याचा निर्णय झाला आहे; परंतु हा निर्णय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेसह एकत्रित घेतला जाईल का, याबद्दलही स्थानिक नेतृत्वाला काहीच माहिती नाही.

'उटा'चा निर्णय लवकरच

१) फर्मागुढी येथे काल (शुक्रवारी) झालेल्या 'उटा'च्या जाहीर समेत गोविंद गावडे यांच्या पाठीशी एसटी समाज राहील, असे जाहीर केले. या समेत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, तसेच भारतीय जनता पक्षाला लक्ष्य बनविण्यात आले.

२) या संदर्भात 'गोमन्तक'शी बोलताना 'उटा'चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी संघटनेचा पुढचा निर्णय आम्ही लवकरच जाहीर करू, असे सांगितले. गोविंद गावडे यांना पदच्च्युत केल्यास 'उटा' आपली पुढील भूमिका स्पष्ट करेल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

Goa Fishing Boat Missing: सोमवारी निघाले, पण परतलेच नाहीत! काणकोणच्या समुद्रात मासेमारी बोट गायब; 4 मच्छिमारांचा जीव टांगणीला

'पर्रीकरांच्या काळात असं नव्हतं, आत्ताच्या गोवा सरकारमध्ये सगळे हफ्ते मागतायेत'; माजी भाजप मंत्र्याचा गंभीर आरोप, केजरीवालांनी शेअर केला व्हिडिओ

AUS vs ENG 3rd Test: इंग्लंडच्या फलंदाजांना धडकी भरवणारा गोलंदाज आता घडवणार इतिहास; तिसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्क मोडणार अँडरसनचा मोठा रेकॉर्ड!

Goa Today News Live: आयडीसीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सांकवाळमधील कंपनीत घुसून लंपास केला लाखो रुपयांचा मुद्देमाल

SCROLL FOR NEXT