हरमल: हरमल पंचायत क्षेत्रातील मासळी मार्केटच्या छपराचे काम पूर्ण झाल्याने मासे विक्रेते आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या मार्केटच्या अंतर्गत फरशीचे काम सुरू असून, पावसाळ्यातील गैरसोय दूर झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचे अभिनंदन केले आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या मार्केटचे भूमिपूजन मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते, आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत झाले होते. हरमलसह परिसरातील चार-पाच गावांतील ग्राहक आणि मासेमारी व्यवसायिकांसाठी हे मार्केट महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. हरमल गावात मच्छीमारांची संख्या मोठी असून येथे दररोज ताजी मासळी उपलब्ध होते. पर्यटन हंगामात तर स्थानिकांसह पर्यटकांचीही मोठी गर्दी या मार्केटमध्ये पाहायला मिळते.
हाउसिंग बोर्डाचे संचालक प्रवीण वायंगणकर यांनी मतदारसंघात आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार आरोलकर यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. सरपंच दिव्या देऊ गडेकर यांनीही मार्केटचे काम पूर्ण करून विक्रेत्यांची पावसाळ्यातील अडचण दूर केल्याबद्दल आमदार आरोलकर यांचे आभार मानले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.