तियात्रीस्ट प्रिन्स जेकब,आमदार विजय सरदेसाई  Dainik Gomantak
गोवा

Goa: फॉरवर्डची तियात्र आणि नाटक सादरीकरणासाठी रु 30,000 ची घोषणा

सरकार (Government)आणि राजकारणी (Politician)त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत कारण तियास्त्रीत त्यांच्या कृत्यांवर टीका करतात. तियात्रद्वारे आम्ही फक्त हे दर्शवितो की कोणी कुठे आपली चूक सुधरायला हवी.

दैनिक गोमन्तक

मडगाव: प्रसिद्ध तियात्रीस्ट प्रिन्स जेकब यांनी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांच्या तियात्र आणि नाटक पुन्हा सुरू करण्यास मदत करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कोविडमुळे (covid 19) गेल्या दोन वर्षांपासून तियात्र व नाटकाचे प्रयोग झालेले नाही. यासाठी सरदेसाई यांनी थेटर शुल्क भरण्यास कलाकारांना मदत करायला, तीन प्रयोगांसाठी ३० हजार रुपयांची मदतीची घोषणा केली आहे. प्रत्येक प्रयोगासाठी 10,000 दिले जातील, अशा तीन प्रयोगांना ही मदत दिली जाणार.

मागील चार दशकांपासून तियात्र क्षेत्रात सेवा देणारे तियात्रिस्त प्रिन्स जेकब (Prince Jacob) यांनी शुक्रवारी फातोर्डा येथील गोंयकार घरमध्ये गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यासह पत्रकार परिषद (Press conference)संबोधित केली आणि सांगितले की कलाकारांना त्रास होत असल्याने तियात्राची सुरुवात होणे आवश्यक आहे.

सरदेसाई म्हणाले की, सरकारने गेल्या जूनमध्ये कलाकारांना एकाच वेळेसाठी 10000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. सरकारने आता सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेवर तियात्र आणि नाटक पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे, मात्र भाडे माफ करण्यात अपयशी ठरले आहे.

मी तियात्रिस्त आणि नाटक कलाकारांना माझ्या वेतनातून मदत करून पाठिंबा देईन असे मी जाहीर केले होते. मी इतर आमदारांनाही (MLA)आपापल्या मतदारसंघात असेच करण्याचे आवाहन केले होते. मला वाटते की आमच्या सर्व आमदारांनी हे अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे.असे सरदेसाई म्हणाले.

ते म्हणाले की, वचन दिल्याप्रमाणे, ते रवींद्र भवन (Rabindra Bhavan)किंवा इतर सभागृहांचे भाडे देण्यासाठी तियात्र किंवा नाटक दिग्दर्शकाला 10 हजार रुपये देतील. "अशा तीन प्रयोगासाठी मी प्रत्येक दिग्दर्शक किंवा निर्मात्याला मदत करीन.

तियात्रा ही आमची ओळख आहे आणि तियात्र आणि नाटकाद्वारे हे कलाकार (Artist)केवळ समाजाला चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत नाहीत तर ते आमचे मनोरंजन देखील करतात. हे खूप महत्त्वाचं आहे.

ते म्हणाले की, रवींद्र भवनाच्या अध्यक्षांना जर तियास्त्रीतांबद्दल काही चिंता असती तर त्यांनी त्यांच्यासाठी सभागृह मोफत दिले असते. "नवीन राजकीय पक्ष गोव्यात येत आहेत आणि गोव्याच्या लोकांनी मागणी केलेली नसतानाही, वचने देत आहेत, परंतु गोव्यातील कलाकारां संदर्भात चिंता व्यक्त करण्यात ते अपयशी ठरले.

जेकब म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून कोणीही तियात्रितांस्बद्दल चिंता व्यक्त केलेली नाही. कलाकारांना मदत केल्याबद्दल मी विजय सरदेसाई यांचा खरोखर आभारी आहे. असे जेकब म्हणाले.

सरदेसाई या उपक्रमातून कोणतेही राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तियास्त्रीत आणि नाटक कलाकार ही मदत घेऊ शकतात आणि आम्ही वचन देतो की आम्ही तुमच्या प्रयोगात हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही माझ्यावर किंवा विजय सरदेसाई यांच्यावर गाणे देखील सादर करू शकता.

जेकब म्हणाले की, सरकार आणि राजकारणी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत कारण तियास्त्रीत त्यांच्या कृत्यांवर टीका करतात. तियात्रद्वारे आम्ही फक्त हे दर्शवितो की कोणी कुठे आपली चूक सुधरायला हवी. आमची टीका सकारात्मक घेतली पाहिजे. असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT