Goa: मडगाव अर्बन बँकेच्या ठेवी परतावा प्रक्रिया सुरू

ठेवीदारांनी आपल्या परताव्याचे दावे दोन महिन्यात सादर करावेत असे बँकेने (Bank) म्हटले आहे.
Margao  Urban Bank's deposit repayment process started
Margao Urban Bank's deposit repayment process startedDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: आर्थिक डबघाईला आल्याने आरबीआयकडून (RBI) बंदी लादलेल्या मडगाव अर्बन सहकारी बँकेने (Urban Cooperative Bank) आजपासून ठेवीदारांच्या बँकेत अडकलेल्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. ठेवीदारांनी आपल्या परताव्याचे दावे दोन महिन्यात सादर करावेत असे बँकेने (Bank) म्हटले आहे. सध्या या बँकेत लोकांचे सुमारे 190 कोटी रुपये अडकले असून बँकेकडे फक्त 122 कोटी रोख रक्कम उपलब्द आहे. 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी खातेदारांना सुरवातीला मिळण्याची शक्यता आहे.

Margao  Urban Bank's deposit repayment process started
Goa: कळंगुट बीच पर्यटकांनी फुलला

या बँकेवर सरकारने नियुक्त केलेले लिक्विडेटर एस. व्ही नाईक यांनी आज नोटीस जारी केली आहे. ठेवीदारांनी आपल्या ठेवींच्या पावत्या किंवा खात्याचे पासबुक आपल्या दाव्यासोबत सादर कराव्यात असे या नोटीसीत म्हटले आहे. दरम्यान बँकेतील लॉकरमध्ये ज्यांनी आपल्या वस्तू ठेवल्या आहेत त्या 30 सप्टेंबर पर्यत लोकांनी घेऊन जाव्यात असेही या नोटीसीत म्हटले आहे.

Margao  Urban Bank's deposit repayment process started
Goa: क्षुल्लक कारणासाठी काढली तलवार

मडगाव अर्बन ही गोव्यातील काही प्रमुख सहकारी बँकापैकी एक मानली जायची मात्र खनिज व्यावसायिकांना कर्ज देताना विशेष खबरदारी न घेतल्याने ही कर्जे बुडून ही बँक नुकसानीत गेली होती. त्यामुळेच आरबीआयने तिच्यावर बंदीची टाच आणली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com