Ankur Kumar Gomantak Digital team
गोवा

Goa News : १० वर्षीय बालकाने वाचवले तिघांचे प्राण

अंकुरकुमारचे धाडस : बुडणाऱ्या मित्रांना पोहत जाऊन काढले नदी पात्रातून बाहेर

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News : सरकारी प्राथमिक विद्यालय कुंभारजुवे येथे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अंकुरकुमार संजय प्रसाद या दहा वर्षीय मुलाने नदीत बुडणाऱ्या तिघांचे प्राण वाचवले. मिळालेल्या माहितीप्रमाणे येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण पालखी गावातील प्रत्येक घराला भेट देत असते त्या पालखी उत्सवात लोक गुलाल अर्पण करतात आणि देवीचा आशीर्वाद म्हणून पुजारींकडून गुलाल घेतात. शनिवार 25 मार्च रोजी दुपारी 3: 30 च्या सुमारास देवीची पालखी सुरूचेभाट कुंभारजुवे येथे होती.

सर्व लोक उत्सवात आणि देवीच्या आगमनाच्या तयारीत व्यग्र होते.तर काही मुले तिथे गुलालासोबत खेळत होती. अचानक एका मुलाच्या डोळ्यात गुलाल गेला म्हणून त्याने जवळच असलेल्या नदीत डोळे धुवायचे ठरवले.

त्यामुळे तो त्याच्या मित्रांसोबत गेला.धुत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते नदीत पडले.पोहणे न जाणणारे विजयकुमार,आर्यन आणि मुकेश हे नदीत उतरले, पण पाय घसरून पाण्यात पडले आणि बुडू लागले.अंकुरकुमार जवळच सायकल चालवत होता. त्याने त्यांना बुडताना पाहिले. त्याचे मित्र बुडत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्यामुळे त्याने या घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना दिली, परंतु लोकांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही.अंकुरकुमार हतबल झाला, पण तो गप्प बसला नाही.त्याला थोडे पोहणे माहीत असल्याने त्याने नदीत उडी मारून महत्प्रयासाने त्यांना बाहेर काढले. दरम्यान, शिक्षिका मनिषा सावंत यांनी त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली.

धैर्याचे विद्यार्थी, शिक्षकांकडून कौतूक

विजयकुमार पूर्णपणे फुगलेला असल्याने अंकुरकुमारने छाती आणि पोट दाबून विजयकुमारच्या पोटातील जास्तीत जास्त पाणी काढले.त्यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्याला हलवल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल केले.आता तो धोक्याबाहेर आहे, अशी जेव्हा बातमी शाळेत पोहोचली, तेव्हा शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी अंकुरकुमारने दाखवलेल्या धैर्याबद्दल त्याचे कौतुक केले.

अंकुरकुमार संजय प्रसाद (10 वर्षे) हा बिहारचा. तो कुंभारजुवे येथे आई, वडील आणि बहिणीसोबत राहतो. सरकारने अंकुरकुमारच्या या शौर्याची दखल घेण्याची आवश्‍ययकता हे. स्थानिक पातळीवर पंचायत,क्लब यांनीही त्याच्या धैर्याचे कौतुक केले पाहिजे, असे शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT