Goa Police
Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोव्यातील चोपडे पुलावरुन उडी घेतलेल्याचा शोध लागेना!

दैनिक गोमन्तक

Goa Police: शिवोली-चोपडे पुलावरून 10 आॉक्टोबरच्या संध्याकाळी पाण्यात उडी घेतलेल्या अज्ञाताचा आठ दिवस उलटले तरी शोध लागलेला नाही. हणजुण पोलिसांनी स्थानिक किनारी पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवूनही बुडालेल्याचा शोध लागू शकला नसल्याने रहिवाशांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ओशेल शिवोली (Siolim) येथील सुभाष नागवेंकर ही व्यक्ती घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांकडून 10 आॉक्टोबरलाच हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली होती,अशी माहिती निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिली.

पुलावरून उडी घेतलेल्या व्यक्तीचा पाण्यावर तरंगतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांत प्रसृत झाल्याने पोलिसांनी त्या व्हिडीओच्या आधारे बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत मृतदेह समोर येत नाही, तोपर्यंत काहीच सांगता येत नसल्याचे नागवेंकर कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.

दरम्यान, शापोरा नदीच्या मध्यभागी एक छोटेसे बेट असून या बेटावर मगरींचे वास्तव्य असल्याचे अनेकांनी सांगितले. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी पुलावरून शापोरा नदीत उडी घेतलेल्याचा नाविक दलाच्या विशेष पथकांकडून शोध घेणे आवश्यक असून आमदार दिलायला लोबो यांनी लक्ष घालावे,अशी मागणी जोर धरत आहे.

सागरी पोलिसांच्या बोटी गंजलेल्या!

शिवोलीतील किनारी पोलिस दलाकडील अत्याधुनिक बोटी पूर्णपणे गंजून गेल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे स्थानिक मच्छिमारांच्या होड्यांची मदत घेतली जात आहे. शिवोली चोपडेच्या पुलावरून उडी घेतलेल्या अनोळखीचा शोध घेण्याचे सागरी पोलिस (Police) दलाचे प्रयत्न गेले आठ दिवस निष्फळ ठरल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुर्दैवाने देशावर सागरी आक्रमण झाल्यास सागरी पोलिस बघत बसतील का?असा संतप्त सवाल याभागात विचारला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

Goa And Kokan Today's Live News: 2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT