Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: शिवोली - हडफडेत गांजा विकण्यासाठी आलेल्या आंध्र प्रदेशातील दोघांना अटक; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Drugs Case: पीएसआय साहिल व्ही. वारंग यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सापळा रचत शोध मोहीम सुरु केली होती.

Ganeshprasad Gogate

Goa Drugs Case: गुरुवारी 25 जानेवारी रोजी शिवोली आणि हडफडे येथील ग्राहकांना गांजा विकण्यासाठी आलेल्या आंध्र प्रदेशातील दोघांना हणजूण पोलिसांनी ताब्यात घेतलाय.

पोतनूरी श्रीनिवास (वय 29 रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) आणि थमदला जगदीश (वय 26, वाकापल्ले, आंध्र प्रदेश) अशी त्या ताब्यात घेतलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून सुमारे दोन लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय.

आंध्रप्रदेशातून दोन व्यक्ती गोव्यात गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पीएसआय साहिल व्ही. वारंग यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सापळा रचत शोध मोहीम सुरु केली होती.

दरम्यान आज या दोघांकडे पोलिसांना अमली पदार्थ आढळून आल्यावर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर हणजूण पोलीस ठाण्यात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत पीएसआय साहिल व्ही. वारंग याच्या सहित पीएसआय साहिल व्ही. वारंग यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय स्वप्नील नाईक, पोलीस हवालदार महेंद्र मांद्रेकर, रूपेश आजगावकर, शांबा शेटगावकर, दीपेश चोडणकर, लक्ष्मण सावलदेसाई, मयूर घाडी, शानू राऊत आणि सत्येंद्र नसनोडकर या पोलीस पथकाने ही कारवाई केलीय.

गोव्यात अंमली पदार्थ तस्कराची टोळी असण्याची शक्यता असून पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

परराज्यातून येणाऱ्या सर्व गाड्या तपासणी नाक्यावर तपासल्या जात असून पोलिसांची महत्वाच्या शहरांसह गोव्याच्या किनारी भागात रात्रीची गस्त मोहीम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT