Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा

दिगंबर कामत यांची उपस्थिती भाजपसाठी अपशकुन- काँग्रेस

Pramod Yadav

भाजपने दक्षिण गोव्यातील लोकांच्या भावनांचा अपमान केला- काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर

काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, दक्षिण गोवा निवडणूक प्रचाराची सुरुवात देव दामबाब, देवी शांतादुर्गा, देव मल्लिकार्जुन किंवा दक्षिणेतील इतर कोणत्याही धार्मिक स्थळी जावून प्रार्थना करुन करायला हवी होती. दक्षिण गोव्यात राहणाऱ्या गोमंतकीयांच्या भावना आणि श्रद्धेचा अपमान केला.

दिगंबर कामत यांची उपस्थिती भाजपसाठी अपशकुन- काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर

दिगंबर कामत यांनी महालक्ष्मीच्या मंदिरात घेतलेली शपथ मोडून देवीचा "अपमान" केला होता. आज त्यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात हजेरी लावून भाजपच्या दोन्ही उमेदवारांना "अपशकुन" केला आहे. दोन्ही जागा भाजप नक्कीच गमावेल. पराभव नक्की होणार हे माहित असल्यानेच गॉडमेनने भाजपची उमेदवारी नाकारली होती.

Digambar Kamat

दोन्ही उमेदवारांसाठी कार्यकर्ते काम करुन विजयी करतील - मुख्यमंत्री

श्रीपाद नाईक यांनी विकास कामे केली नसल्याचा आरोप विरोधक करतायेत, पण त्यांनी भाऊंची मतदारसंघातील कामे पाहिली नाहीत. प्रत्येकाला श्रीपाद नाईक माहिती आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

पल्लवी धेंपे यांचा जनसंपर्क नसेल पण, कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करतील आणि दोन्ही जागा जिंकून येण्यास मदत करतील, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले

मांद्रे पोलिसांची मोठी कारवाई, 14.36 लाखांच्या अमली पदार्थासह एकाला अटक

मांद्रे पोलिसांची मोठी कारवाई. मोहम्मद निसार निहाल (29 रा. गावडे वाडो, मांद्रे पेरणे मूळ - कुन्नूर, केरळ) याला 14, 36,300 किंमतीच्या अमली पदार्थासह अटक. त्याच्याकडून 2.63 ग्रॅम चरस, 123 LSD पेपर्स जप्त करण्यात आले आहेत. मांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरु.

Mandrem Police

भाजपने फोडला प्रचाराचा नारळ !

गोवा प्रदेश भाजपाने पणजीत महालक्ष्मीला नारळ ठेऊन फोडला लोकसभा प्रचाराचा नारळ. श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे ह्या दोन्ही उमेदवारांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती.

Goa BJP Loksabha
Goa BJP Loksabha

पेडे- बाणावलीत 35 वर्षीय व्यक्तीचा खून, पोलिस घटनास्थळी

murder at peda benaulim

पेडे- बाणावलीत 35 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आले असून, कोलवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विश्वनाथ सिधनाल (35, लोंडा, कर्नाटक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

आके-मडगाव येथे मद्यसाठा जप्त

Illegal Liquor Seized

आके-मडगाव येथे मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. अबकारी खात्याच्या छापेमारीत ही कारवाई करण्यात आली.

Goa Liquor Scam

श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांनी घेतली ब्रह्मेशानंद स्वामींची भेट

भाजपचे गोव्यातील दोन्ही लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांनी ब्रह्मेशानंद स्वामींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

इंडी आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर रोखले.

दिल्लीचे मुख्यमत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानावर इंडी आघाडीने आज (मंगळवारी) सकाळी सभा ठेवली होती.

INDIA Alliance | Azad Maidan Goa

फातोर्डा केटीसी मार्गावर अपघात, दुचाकी चालक जखमी

Fatorda Accident

फातोर्डा केटीसी मार्गावर अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. धावत्या बसला दुचाकीने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमी दुचाकी चालकावर उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पणजी स्मार्ट सिटी प्रदूषण; दोन जनहित याचिकांवर आज सुनावणी

Panaji Smart City PIL

पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या दोन जनहित याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होणार आहे.

Smart City Panaji

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT