Big Debate: निलेश काब्राल वीजमंत्री सत्येंद्र जैन  Dainik Gomantak
गोवा

Big Debate: दिल्ली-गोव्याचे वीजमंत्री आज आमने-सामने

मोफत वीज देण्यावरून गोवा आणि दिल्लीच्या वीजमंत्र्यांत कसले सवालजवाब (Big Debate) घडतील, याची प्रचंड उत्सुकता गोमंतकीयांना लागली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मोफत वीज देण्यावरून गोवा (Goa) आणि दिल्लीच्या (Delhi) वीजमंत्र्यांत कसले सवालजवाब घडतील, याची प्रचंड उत्सुकता गोमंतकीयांना लागली आहे. निलेश काब्राल यांचे खुल्या चर्चेचे आव्हान दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्वीकारल्यानंतर ही चर्चा (Big Debate) होत आहे. त्यामुळे चर्चेतून कोण कुणाचा ‘फ्यूज’ उडवणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. (Goa and Delhi power ministers will discuss free electricity today)

काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषेदत वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आज दुपारी ३ वा. पणजीतील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ही चर्चा आयोजित करण्यात येईल, असे सांगितले होते. त्या अनुषंगाने दिल्लीचे वीजमंत्री सत्‍येंद्र जैन यांनी काब्राल यांचे आव्हान स्वीकारत रविवारी गोवा गाठले. दुसरीकडे, राज्याचे वीजमंत्री नीलेश काब्रालही चर्चेचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत.

काब्राल यांच्या अनेक पळवाटांनंतर आम आदमी पार्टी अखेर गोमंतकीयांसमोरील ‘सार्वजनिक पैशांचा वापर आमदारांच्या खरेदीसाठी करायचा की, जनतेला २४ तास वीज देण्यासाठी’ हा प्रश्‍न घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळे या दोन वीजमंत्र्यांमध्ये होणाऱ्या चर्चेतून ‘भाजप’ व ‘आप’ हे दोन्ही पक्ष कितपत या प्रश्‍नाबाबत गंभीर आहेत, हे दिसणार आहे.

"राज्याला शेजारील राज्यातून वीज खरेदी करावी लागते त्यामुळे ही वीज ३०० युनिटपर्यंत मोफत देणे अशक्य आहे. चर्चेसाठी मी तयार आहे. राज्याच्या प्रश्‍नांबाबत मी कधीही मागे हटणार नाही."

- नीलेश काब्राल, वीजमंत्री, गोवा.

"जर मंत्र्यांना मोफत वीज दिली जाऊ शकते, तर मग आपल्या कुटुंबासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या गोमंतकीयांना ती वीज मोफत का मिळत नाही? "

- सत्येंद्र जैन, वीजमंत्री, दिल्ली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

Rashi Bhavishya 07 September 2025: नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश , आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल

SCROLL FOR NEXT