Sanquelim Amone Road Accident, Navelim Truck Accident Dainik Gomantak
गोवा

Navelim Truck Accident: चालकाचे नियंत्रण गेले, ट्रक घुसला घरात! छपरासह कुंपणाची मोडतोड; चालक जखमी

Sanquelim Amone Road Accident: स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत पोलिसांना माहिती दिली. पुढील चौकशी साखळी पोलिस करीत आहेत. या अपघातामुळे रस्त्यावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Sameer Panditrao

डिचोली: चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण गेल्याने ट्रक चक्क रस्त्याला टेकून असलेल्या कुंपणाला धडकून घरात घुसला. हा अपघात आमोणे-साखळी रस्त्यावरील न्हावेली येथे सोमवारी श्री आजोबा मंदिराच्या मागच्या बाजूने घडला.

या अपघातात घराच्या छपरासह कुंपणाची मोडतोड होऊन ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. मात्र, अन्य कोणताच अनर्थ घडला नाही.या अपघातात ट्रकाची किरकोळ मोडतोड मिळून हजारो रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती मिळाली आहे. हा जीए-०१-यू-३२७५ या नोंदणी क्रमांकाचा ट्रक सरळ उजव्याबाजूने रस्त्याबाहेर गेल्याने हा अपघात घडला.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत पोलिसांना माहिती दिली. पुढील चौकशी साखळी पोलिस करीत आहेत. या अपघातामुळे रस्त्यावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

गोव्‍यातील वारकरी अपघातात जखमी

पंढरपूरहून गोव्यात परतणाऱ्या वारकऱ्यांची मोटारगाडी आजरा-कोल्हापूर महामार्गावर पलटी होऊन झालेल्या अपघातात हातुर्ली-मये येथील ४ वारकरी जखमी झाले. त्‍यात तीन महिला असून दोघींना गंभीर दुखापत झाली आहे. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Kala Academy: कला अकादमीच्या कामाचे पुन्‍हा होणार स्‍ट्रक्‍चरल ऑडिट, 'पीडब्‍ल्‍यूडी'चा मोठा निर्णय

Goa Politics: "विधानसभेत आमचे प्रश्न ऐकले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार", विजय सरदेसाईंचा सरकारला इशारा

Goa Health Department: राज्यातील आरोग्य व्यवस्था होणार बळकट; डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका भरतीस सरकारची मान्यता

Aggressive Dogs Ban: राज्यात हिंस्र कुत्र्यांच्या जातींवर बंदी; रॉटविलर, पीटबुल बाळगल्यास कारवाई होणार, CM सावंतांची माहिती

Guru Purnima 2025 Wishes: जो अंधारातही वाट दाखवतो… गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT