Goa Airport is leading airport in country Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे विमानतळ देशात अग्रेसर

कोरियन तंत्रज्ञानाचा वापर, पाच कोटीहून अधिक खर्च

दैनिक गोमन्तक

वास्को: विमानांच्या उड्डाणासाठी सुरक्षित नेव्हिगेशनची गरज असते. यासाठी ‘डीव्हीओआर’ अर्थात डॉप्‍लर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओम्नी रेंज प्रणाली वापरली जाते. गोव्यातील (Goa) दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) यातील अत्याधुनिक नवीन नेव्‍हिगेशन सिस्टम बसवण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची सिस्टम बसवली असून, कोरियन तंत्रज्ञानाच्या या नव्या प्रणालीसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.

विविध प्रकारच्या प्रयत्नांमधून ही नवीन दक्षिण कोरिया तंत्रज्ञानाची नवी प्रणाली गोवा विमानतळावर बसवण्यात आली आहे. या अत्याधुनिक प्रणालीमध्ये अत्यंत कमी जागेवरूनही विमानांना अचूक माहिती मिळणार आहे. ही अत्यंत नवी प्रणाली असून आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थेचे मानांकन असणारी प्रणाली आहे. विमानांना सुरक्षित उड्डाण आणि लँडिंग करताना अत्यंत अचूक माहितीची गरज असते ती व्यवस्था या यंत्रणेत असून विमानांच्या वैमानिकांना कमी वेळेत त्यांच्या परिभाषेत ही माहिती पुरवली जाणार आहे.

अडथळे होणार दूर

विमानतळावरील विमानांची ये-जा आणि हवाई मार्गातील नियंत्रण यांचे पालन करून विमानाला त्यांच्या उड्डाण आणि लँडिंग मार्गाची स्थिती ठेवण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. ही यंत्रणा नसल्यास विमानांना त्यांच्या येजा करण्यावर अडथळे येतात ते आता या नव्या प्रणालीने दूर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tiger Reserve Goa: समिती करणार व्याघ्र प्रकल्प क्षेत्र पाहणी, गुरूवारी सचिवालयात होणार संबंधित घटकांशी चर्चा

Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवी नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

बहुजनांचा कैवारी हरपला! रवी नाईक यांच्‍यावर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार, अखेरच्‍या दर्शनास जनसागर

Horoscope: भावनिक निर्णय टाळा! प्रिय व्यक्तीचा पाठिंबा, नवीन संधी मिळतील आणि प्रयत्नांना यश मिळेल

रवींचा वारसा पुढे कोण चालवणार? रॉय का रितेश कोणाला मिळणार उमेदवारी? फोंड्यात लवकरच होणार पोटनिवडणूक

SCROLL FOR NEXT