Goa airport flight disruption Dainik Gomantak
गोवा

गल्फ एअऱची बहरीन-दाबोळीदरम्यानची सर्व उड्डाणे 26 मार्चपर्यंत रद्द! दुबई–दाबोळी सेवा स्थगित; युरोपकडील विमानांनाही मर्यादा

Goa airport flight disruption: भारतीय विमान प्राधिकरणाने जारी केलेल्या सूचनेनुसार, गल्फ एअऱची बहरीन-दाबोळीदरम्यानची सर्व उड्डाणे २६ मार्चपर्यंत रद्द केली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आखाती देशांशी असलेली हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे गोव्यातील विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात मार्चपर्यंत अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. युरोपकडे जाणाऱ्या विमानांचा मार्गही आखाती देशांवरून जाणारा नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय विमान प्राधिकरणाने जारी केलेल्या सूचनेनुसार, गल्फ एअऱची बहरीन-दाबोळीदरम्यानची सर्व उड्डाणे २६ मार्चपर्यंत रद्द केली आहेत. तसेच एअर इंडिया एक्सप्रेसने दुबई–दाबोळी सेवा २८ मार्चपर्यंत स्थगित केली आहे.

शिवाय इतर अनेक आंतरराष्ट्रीय मार्गांवरही परिणाम झाला आहे. एअर अरेबियाची शारजाह-मोपा सेवा, कतार एअरवेजची दोहा-मोपा उड्डाणे, तसेच दुबई मार्गावरील अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्याय अत्यंत मर्यादित झाले आहेत.

दरम्यान, प्रशासनाने प्रवाशांना संबंधित एअरलाईन्सकडून उड्डाणांची स्थिती तपासून पाहण्याचे तसेच विमानतळावर जाण्यापूर्वी आवश्यक त्या पुनर्बुकिंगची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Goa School: आगरवाडा हायस्कूल इमारतीची आरोलकरांकडून पाहणी; कामातील त्रुटींवर व्यक्त केली नाराजी

Mulgao mining: मुळगावात खाणविरोधातील लढा संघटितपणे तीव्र करण्याचा निर्धार; जाहीर सभेत गावकऱ्यांची वज्रमूठ!

Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Dudhsagar Jeep Election: जीप असोसिएशनच्या निवडणुकीत नीलेश वेळीप यांचा डंका, दिलीप मायरेकर आणि मयूर मराठेही विजयी; नव्या नेतृत्वाला कौल!

SCROLL FOR NEXT