Messy Airbnb room in Goa with used utensils, food waste and scattered packaging Dainik Gomantak
गोवा

Airbnb Viral Video: वापरलेली भांडी, अन्नाचा कचरा अन् रिकाम्या पॅकेट्सचा खच! गोव्यातील Airbnbचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह

Goa Airbnb Viral Video: गोवा हे देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येतात आणि हॉटेल्ससोबतच Airbnb व होमस्टेचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

Sameer Amunekar

गोवा हे देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी येतात आणि हॉटेल्ससोबतच Airbnb व होमस्टेचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र अशाच एका Airbnb मध्ये घडलेल्या प्रकाराने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. एका होस्टने आपल्या 2BHK अपार्टमेंटचा व्हिडिओ शेअर करत पाहुण्यांनी चेकआउटनंतर घराची केलेली दयनीय अवस्था दाखवली. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून जबाबदार पर्यटनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

व्हिडिओमध्ये अपार्टमेंटमधील प्रत्येक खोली अस्ताव्यस्त झालेली दिसते. जमिनीवर अन्नाचे तुकडे, रिकामे स्नॅक्स आणि पेयांचे पॅकेट्स विखुरलेले, डायनिंग टेबलवर न धुतलेली भांडी तसेच स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. घराची अवस्था पाहता अनेक दिवस स्वच्छता झाली नसल्याचा भास होत होता.

होस्टच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ शूट करण्यापूर्वीच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अनेक रिकाम्या बिअरच्या बाटल्या हटवल्या होत्या. त्या जागेवर असत्या तर घराची परिस्थिती आणखी गंभीर दिसली असती.

आधीच दिल्या होत्या सूचना

होस्टने सांगितले की, प्रत्येक नवीन पाहुण्याच्या आगमनापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ करून तयार केले जाते. तसेच चेकआउटपूर्वी विशेषतः स्वयंपाकघर आणि वापरलेल्या जागा स्वच्छ ठेवाव्यात, अशा स्पष्ट सूचना पाहुण्यांना दिल्या जातात. मुक्कामादरम्यान एकदा अतिरिक्त स्वच्छताही करून देण्यात आली होती, जेणेकरून पाहुण्यांना कोणताही त्रास होऊ नये. मात्र या सर्व सुविधांनंतरही पाहुण्यांनी घराची योग्य काळजी घेतली नसल्याचे होस्टने नमूद केले.

पर्यटकांच्या प्रतिक्रियेने वाढली नाराजी

होस्टने या प्रकाराबाबत संबंधित पाहुण्यांशी संपर्क साधल्यानंतर मिळालेल्या उत्तरामुळे त्यांना अधिकच धक्का बसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाहुण्यांनी "थोडाच कचरा आहे, त्यात एवढं काय?" अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिली. या उत्तरामुळे सोशल मीडियावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

अनेक नेटकऱ्यांनी भाड्याने घेतलेले घर असले तरी त्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. काहींनी अशा पाहुण्यांवर अतिरिक्त दंड किंवा सिक्युरिटी डिपॉझिटमधून कपात करण्याची मागणीही केली.

जबाबदार पर्यटनाचा संदेश

व्हिडिओच्या माध्यमातून होस्टने केवळ स्वतःचा अनुभव मांडला नाही, तर सर्व प्रवाशांना महत्त्वाचा संदेशही दिला. पर्यटनासाठी कुठेही मुक्काम करताना त्या जागेचा आदर करणे आवश्यक आहे. Airbnb, होमस्टे किंवा भाड्याचे घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते कोणाच्या मेहनतीने उभे राहिलेले घर असते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

गोव्यासारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटकांनी स्वच्छता, शिस्त आणि स्थानिक नियमांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT