Goa air pollution life expectancy Dainik Gomantak
गोवा

Goa Air Pollution: गोवावासीयांसाठी धोक्याची घंटा! लोकांचे आयुष्य होणार 2 वर्षांनी कमी; 'हवा प्रदूषणा'मुळे गंभीर स्थिती

Goa average lifespan decline: देशभरातील पत्रकार व पर्यावरण तज्‍ज्ञांच्‍या उपस्‍थितीत ‘विज्ञान आणि पर्यावरण केंद्र’ या विचारगटाचा ‘पर्यावरणाची सद्यःस्थिती २०२६’ हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्‍यात आला.

Raju Nayak

निमली: निसर्गरम्‍य गोव्‍याच्‍या नागरी आरोग्‍यासाठी धोक्‍याची घंटा वाजली आहे. ‘वाढत्‍या हवा प्रदूषणामुळे गोव्यातील लोकांचे सरासरी आयुर्मान २ वर्षे दोन महिन्यांनी घटेल’, असा निष्‍कर्ष एका राष्‍ट्रीय अभ्‍यासात काढण्‍यात आला आहे.

देशभरातील पत्रकार व पर्यावरण तज्‍ज्ञांच्‍या उपस्‍थितीत ‘विज्ञान आणि पर्यावरण केंद्र’ या विचारगटाचा ‘पर्यावरणाची सद्यःस्थिती २०२६’ हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्‍यात आला. त्‍यामध्‍ये ‘भारतीय हवामान आणि आयुर्मान’विषयक आढावा घेण्‍यासोबत, देशातील पर्यावरणाचे विस्तृत विश्लेषण केले आहे.

‘एकेकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्यातील हवेचा दर्जा आता खालावू लागला आहे’, असे निरीक्षण नोंदवत तेथील नागरिकांचे सरासरी आयुर्मान घटण्‍याविषयी चिंता व्‍यक्‍त करण्‍यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची सर्वांत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

तेथील लोकांचे आयुर्मान ८ वर्षे २ महिन्यांनी कमी होणार असल्याचा अंदाज उपरोक्‍त अहवालात आहे. हा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. देशातील १६ राज्‍यांच्‍या राजधानीत हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. ग्रामीण भागात मात्र तीव्रता कमी आहे.

जागतिक मानकांचा वापर

एनर्जी पॉलिसी इन्‍स्‍टिट्यूट, युनिव्‍हर्सिटी ऑफ शिकागो यांनी २०२५मध्‍ये प्रसिद्ध केलेल्‍या ‘एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स’ अहवालाचा आधार घेत, देशातील जिल्हानिहाय हवेच्‍या गुणवत्तेचे विश्लेषण ताज्‍या अहवालात करण्यात आले आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेची मानके त्‍यासाठी उपयोगात आणण्‍यात आली.

आरोग्यावर परिणाम

जागतिक आरोग्य संघटनेने दमा आणि श्वासोच्छवासाच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२५ मधील सरासरी हवा गुणवत्ता ‘चांगली’ ते ‘समाधानकारक’ असल्याचे म्हटले असले, तरी वाढत्या नागरीकरणामुळे स्थानिक पातळीवर प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे.

सतर्कतेसह उपाय अपरिहार्य

१.‘पर्यावरणाची सद्य:स्‍थिती २०२६’ अहवाल हवा प्रदूषण, जैवविविधता, पाण्याची टंचाई, प्लास्टिक कचरा आणि सार्वजनिक आरोग्यावर पर्यावरणाचे होणारे परिणाम यांवर भाष्य करतो.

२. देशात २०२३ मध्ये वायू प्रदूषणामुळे सरासरी आयुर्मान ३ वर्षे ६ महिने घसरवल्‍याची नोंद आहे. त्‍यात भर पडली असून, सतर्कतेसह उपायांवर भर गरजेचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT