Varsha Usgaonkar Dainik Gomantak
गोवा

Varsha Usgaonkar: 'गोंय TB मुक्त करुया'; अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याकडून जनजागृती, पाहा व्हिडिओ

Goa TB-Free Campaign: गोमंतकीयांमध्ये टीबीच्या रोगाबाबत जागृती करण्यासाठी गोव्याची लेक आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार वर्षा उसगांवकर या आता पुढे सरसावल्या आहेत.

Manish Jadhav

Goa Aims to Become TB-Free Varsha Usgaonkar Joins Awareness Campaign

गोव्याला टीबीमुक्त करण्यासाठी सावंत सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यातच आता, गोमंतकीयांमध्ये टीबीच्या रोगाबाबत जागृती करण्यासाठी गोव्याची लेक आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर या पुढे सरसावल्या आहेत. होय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टीबीबाबत जागृती करताना वर्षा उसगांवकर दिसत आहेत. संपूर्ण गोव्याला लवकरात-लवकर टीबीमुक्त करण्याचा मानस सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

व्हिडिओ पाहा

गोवा टीबीमुक्त करण्याचा संदेश

व्हिडिओमध्ये तुम्ही वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांना तुम्ही गोव्याला टीबीमुक्त करण्याचा संदेश देताना पाहू शकता. टीबी रुग्णांसाठी खबरदारी आणि वेळेवर उपचार घेणे किती गरजेचे आहे याबद्दल वर्षा उसगांवकर या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. टीबी रुग्णांनी आपल्या आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा हालगर्जीपणा करु नये असेही त्यांनी पुढे सांगितले. यापूर्वीही, वर्षा उसगांवकर यांनी सरकारकडून गोमंतकीयांसाठी राबवलेल्या जागृती मोहीमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला आहे. व्यस्त कामातून वेळ काढून वर्षा उसगांवकर गोव्यात येत असतात.

गोव्याला टीबीमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबी मुक्त पंचायत’ उपक्रमांतर्गत, पंचायतींना सक्रिय उपाययोजना करण्यासाठी सक्षम करण्यात आलेले आहे. गोव्यात क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत निदान चाचण्या, उपचार सेवा आणि पोषण सहाय्य पुरवले जाते. गोव्याला (Goa) ‘टीबी’मुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT