Goa AI Policy Dainik Gomantak
गोवा

Goa AI Policy: 'येत्या 100 दिवसांत आणणार ‘एआय’ धोरण'; रोहन खंवटेंनी दिली माहिती Watch Video

Rohan Khaunte: राज्यातील नागरिकांना त्यांच्या भाषेत सुविधा आणि सेवा पुरविण्यासाठी कोकणी एआय ॲप बनविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा राज्य ‘एआय’ हब व्हावे, शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश व्हावा, रोजगार वाढावेत यासाठी स्थानिक शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वांनाच लाभदायी ठरणारे गोमंतकीयांना प्राधान्य देणारे ‘एआय’ धोरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून येत्या १०० दिवसांत लागू करणार असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी ‘एआय’ धोरणासंबंधी मांडलेल्या खासगी ठरावावेळी बोलत होते. आज विद्यार्थी आपल्या अभ्यासासाठी विविध एआय टूल्सचा स्वतःहून वापर करत आहेत आणि अभ्यासाच्या अनुषंगाने एआय लाभदायीदेखील ठरत आहे.

राज्यातील नागरिकांना त्यांच्या भाषेत सुविधा आणि सेवा पुरविण्यासाठी कोकणी एआय ॲप बनविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कोकणीतून हवामान, पिकासंबंधी माहिती मिळेल. आरोग्य सेवा, सार्वजनिक सेवा प्राप्त व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

मंत्री रोहन खंवटे म्हणाले...

‘एआय’ अंमलबजावणी डिजिटल साधनसुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

गोवा ऑनलाईन आणि चॅटबोटच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी सेवा अतिशय सुलभ पद्धतीने पुरविल्या जात आहेत.

राज्यातील प्रत्येक पदवीधर हा ‘एआय’ प्रशिक्षित असावा यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.

एआय सेंटर ऑफ एक्सलेन्स, प्रयोगशाळा उभारणी, संशोधन आणि विकास यांना प्राधान्य देणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य.

‘एआय’संबंधी कायदा करा!

सध्याच्या युगात ‘एआय’ महत्त्वपूर्ण ठरत आहे. परंतु याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेदेखील आहे. आज कुणाचाही आवाज आणि चित्र वापरून तंतोतंत व्हिडिओ तयार केले जातात. त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे एआय धोरणात दुरूपयोग केल्यास कठोर कारवाईची तरतूददेखील असणे गरजेचे असल्याचे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT