Goa AI Traffic Cameras Dainik Gomantak
गोवा

Goa AI Traffic Cameras: वाहतूक पोलिसांचा 'AI' वॉरंट! बेफाम ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर आता रोबो-कॅमेऱ्यांची नजर; चुकीला माफी नाही

Goa Road Accidents Control: राज्‍यात वाढत असलेल्‍या अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी वाहतूक खात्‍याने बुधवारपासून राज्‍यभरातील विविध जंक्‍शनवर एआय कॅमेरे बसविण्‍याचे निश्‍चित केले होते.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यात वाढत असलेल्‍या अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी वाहतूक खात्‍याने बुधवारपासून राज्‍यभरातील विविध जंक्‍शनवर एआय कॅमेरे बसविण्‍याचे निश्‍चित केले होते. परंतु, हा निर्णय १५ दिवसांनी पुढे ढकलला असून, १५ जुलैपासून कॅमेरे बसविण्‍याचे खात्‍याने निश्‍चित केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो म्‍हणाले, की रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी १ जुलैपासून राज्‍यातील विविध भागांतील जंक्‍शनवर एआय कॅमेरे बसविण्‍याचे नियोजन खात्‍याने केले होते. परंतु, लोकांमध्‍ये पुरेशी जागृती व्‍हावी, यासाठी हा निर्णय १५ दिवसांनी पुढे ढकलला आहे. एआय कॅमेरे बसविण्‍याची प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू करण्‍यात येणार आहे.

स्‍थानिकांसह राज्‍यात येणारे काही पर्यटकही चुकीच्‍या पद्धतीने वाहने चालवतात. त्‍यामुळे अपघात आणि त्‍यात बळी पडणाऱ्यांची संख्‍या वाढत आहे. जीव महत्त्‍वाचा आहे, हे लक्षात घेऊन वाहनचालकांनी वाहन चालविणे गरजेचे आहे. एआय कॅमेरे बसविल्‍यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सतत चलन जात राहील.

रेंट अ बाईक, कारबाबत ६ रोजी बैठकीत निर्णय

गोव्यात (Goa) होणाऱ्या अपघातांमध्‍ये रेंट अ बाईक तसेच रेंट अ कारची संख्‍या वाढत असल्‍याचे सातत्‍याने दिसून येत आहे. सरकारने रेंट अ बाईक, कारना परवाने देण्‍याचे बंद केले आहे. तरीही काहीजणांकडून रोजगारासाठी परवाने देण्‍याची मागणी वाढत आहे. त्‍यामुळे ६ जुलै रोजी खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्‍यात रेंट अ बाईक, कारचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री गुदिन्‍हो यांनी स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT