Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Car catches fire in Saleli: सालेली येथील धबधब्याजवळ सोमवारी दुपारी रिट्झ कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
Saleli Car catches Fire
Car catches fire near Saleli Waterfall in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: सालेली येथील धबधब्याजवळ सोमवारी दुपारी रिट्झ कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. त्‍यामुळे खळबळ उडाली. या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अंदाजे ५ लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. या दुर्घटनेत सुमारे ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

अग्निशमन दलाला दुपारी १२.२८ वाजता घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर ज्ञानेश्वर जी. गावस यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले. पथकाने घटनास्थळी पोहोचून होज रीलच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.

Saleli Car catches Fire
Goa Dhiryo ban: धीरयोला बंदी, तरी झुंजी सुरूच! वार्का व बाणावलीत प्रकारांकडे पोलिसांचे दुर्लक्ष

दुपारी १.५५ वाजता अग्निशमन दलाची कारवाई पूर्ण झाली.आगीत जळालेल्या वाहनाचा क्रमांक जीए-03-पी-4077 असून, ते रिट्झ कार असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. वाहनाच्या मालकाचे नाव मंजुना अम्माना भोवी, रा. काजुवाडा-करापूर, असे आहे.

Saleli Car catches Fire
Goa traffic issue: राज्यात वाहतुकीचा मास्टर प्लॅन गरजेचा

या कारवाईत स्टेशन ऑफिसर ज्ञानेश्वर जी. गावस, डीओपीटी तुळशीदास एस. झर्मेकर, फायर फायटर गंगाराम डी. पावणे, ज्ञानेश्वर एस. सावंत आणि आनंद ए. शेटकर यांनी सहभाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com