Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: फावल्या वेळेत शेतीतून साधला स्वयंरोजगार!

Goa Agriculture: सध्या प्रत्येकजण सरकारी किंवा भरपगारी नोकरीलाच उदरनिर्वाहाचे साधन समजतो.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: सध्या प्रत्येकजण सरकारी किंवा भरपगारी नोकरीलाच उदरनिर्वाहाचे साधन समजतो. भारत हा कृषिप्रधान देश असूनही सध्याची पिढी शेतीकडे व्यवसाय या दृष्टीने पाहात नाही. मात्र, याला फाटा देत वेर्ला-काणका येथील उदेश पेडणेकर (40) याने शेतीलाच पूर्णवेळ व्यवसाय मानला आहे. तसेच सायंकाळी फावल्या वेळेत वडिलांनाही तो गॅरेजमध्ये मदत करतो. यातून उदेशने आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

कलिंगड, कणगी, विविध भाज्यांची लागवड तसेच लोकांना नांगरणीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देत त्याने स्वत:च्या रोजगाराची व्यवस्था केली आहे. आमची शेतजमीन असल्याने माझे वडील शेतात काम करायचे. त्यातूनच मला लहानपणापासून शेतीची आवड निर्माण झाली. आज मी शेतीतून उदरनिर्वाह चालवतो, असे उदेशने सांगितले.

ट्रॅक्टर नांगरणीसाठी उपलब्ध करण्याविषयी उदेश म्हणाला की, मध्यंतरी शेतीकामासाठी लोक मिळत नव्हते. शिवाय ट्रॅक्टरची सेवाही नगण्यच होती. हीच बाब हेरून मी लोकांना ट्रॅक्टरची सेवा पुरविण्याचे ठरविले.

शालेय जीवनातच गिरवा शेतीचे धडे

आजकालचे युवक शेतीकडे रोजगाराचे साधन म्हणून पाहात नाहीत. याविषयी उदेश म्हणाला की, शाळांमध्येच शेतीविषयी जागृती केली पाहिजे. नांगरणी किंवा लागवडीवेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन प्रात्यक्षिक दाखवले पाहिजे.

शेतीकामात त्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. जोवर मुले चिखलात पाय ठेवत नाहीत, तोवर त्यांना त्याची आवड व त्याची माहिती कशी मिळणार? मी 2013 पासून शेती व्यवसायात उतरलो. आज शेती हेच माझे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.

ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा

2013 सालापासून मी ट्रॅक्टरच्या माध्यमातून पर्रा, साळगाव, निर्ला या परिसरातील शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध करतो. यातूनही मला उत्पन्न मिळते. शेतात दरवर्षी कलिंगड, कोबी, कणगी, हिरवी, शिवाय तांबडी भाजी, भेंडी, बटाटे, वाली आदी भाज्यांचे उत्पन्नसुद्धा घेतो, असे उदेश सांगतो.

उदेश पेडणेकर, शेतकरी-

शेती म्हणजे फक्त कष्ट आणि उत्पन्न शून्य, असा काहींचा समज आहे. शेतीतून चांगले उत्पन्न मिळवू शकताे. शेती व्यवसायाला कमी लेखू नये. केवळ भरपगारीच नोकरीमागे पळण्यापेक्षा स्वयंरोजगाराच्या साधनाला आयुष्याचे ध्येय बनवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT