Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: फोंड्यातील ‘कृषिरत्न’ रजतने केली हरितक्रांती!

नवनवीन प्रयोग : निरंकाल परिसरात भाज्यांपासून फळांपर्यंत फुलविले नानाविध मळे

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: एकात्मिक शेती पद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण फोंडा तालुक्यातील रजत रुद्रेश प्रभू या 27 वर्षीय युवा शेतकऱ्याने घालून दिले आहे. वेटलेगल-निरंकाल परिसरात त्‍याने अत्‍याधुनिक पद्धतीने शेती केली असून, या व्‍यवसायाला पुढील स्तरावर नेण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

त्‍याच्‍या सहा हेक्टर जमिनीत पसरलेले हे शेत गावठी भाज्यांपासून देशी-विदेशी फळांपर्यंत आणि इतर अनेक प्रकारच्या पिकांनी भरलेले आहे, जे त्याला प्रचंड उत्पन्न देत आहेच शिवाय अनेकांसाठी रोजगारही निर्माण करत आहे. राज्य सरकारकडून रजतला ‘कृषीरत्न’ पुरस्कारही प्राप्त झालेला आहे.

दापोली विद्यापीठातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवीधारक रजत प्रभू याने पदवी मिळविल्यापासून शेतीमध्ये स्वत:ला झोकून दिले आहे. शेतीचे ज्ञान शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने त्‍याने आचरणात आणले आहे. त्याच्या वडिलांकडे सुमारे 60 हजार चौरस मीटर जमीन आहे, जी अनेक वर्षांपासून नापीक होती.

पण 2016 मध्ये कॉलेजमधून पदवी घेतल्‍यानंतर रजतने ती जमीन शेतीसाठी विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि टप्प्याटप्प्याने 90 टक्‍क्यांपेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आणली.

रजतच्या म्हणण्यानुसार, त्याने 2016 मध्ये त्याच्या संपूर्ण जमिनीला सौरकुंपण घालणे आणि पाण्याचे स्त्रोत विकसित करण्यासाठी विहिरी खोदण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने पहिल्या वर्षी सुरवातीच्या काळात लिंबू आणि काजूची लागवड केली.

नंतर व्यावसायिक स्तरावर काकडी, कस्तुरी, भोपळा, कडबा, मिरची, वांगी आणि भेंडीचे उत्‍पादन घेतले, ज्याचा पुरवठा फलोत्पादन महामंडळांना करण्‍यात येतोय. त्यानंतर संकरीत पपईची लागवड केली, ज्यामध्ये सुमारे 14 टन पपईचे उत्पादन घेतले.

पूर्वजांच्या जमिनी पडीक ठेवू नका

वनस्पती आणि त्यांच्या वाढीमागील विज्ञान शिकले असल्यामुळे ते खूप फायदेशीर ठरते. मला क्रॉप्स कॅलेंडर ऑफ ऑपरेशन आणि इतर पॅरामीटर्स माहित आहेत, जे पिकांची प्रभावीपणे लागवड करण्यास आणि चांगले उत्पादन मिळविण्यात मदत करतात. कोणत्याही प्रकारचे पीक घेताना त्याचा पुरेपूर अभ्यास असणे गरजेचे आहे.

पिके लावली म्हणून होत नाहीत, त्या पिकांची योग्य निगा राखल्यास व मनापासून देखभाल केल्यास ते चांगले होते व उत्पन्नही चांगले मिळते. आजची युवा पिढी सरकारी नोकरीच्या मागे लागत आहे. पूर्वंजांच्या जमिनी पडीक ठेवत आहे.

हे बरोबर नव्हे. जोपर्यंत योग्‍य नोकरी मिळत नाही, तोपर्यंत तरी आर्थिक उत्पन्नासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन व सरकारच्या योजना घेऊन शेती व्यवसाय करावा व आत्मनिर्भर व्हावे, असे रजत प्रभू याने सांगितले.

काळानुरुप शेतीतील व्यवहार्यता आणि नफा समजून घेत पिकांवर प्रयोग केले. त्याचबरोबर नवीन पिके घेण्‍याचा प्रयत्न केला. सर्व नवनवीन प्रयोग स्‍वत: करतो. मग ते कलम करणे असो किंवा रोपाला योग्य खत देणे असो.

असे कौशल्य विकसित केले आहे की अगदी मनापासून मी पिकांशी जोडला जातो. त्यामुळे उत्‍पन्नही चांगले मिळते. - रजत प्रभू, ‘कृषिरत्न’ पुरस्कारप्राप्‍त युवा शेतकरी (निरंकाल)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT