Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: कृषी लागवडीत 1.927 हेक्‍टरने घट! भात लागवडीचे 10,207 हेक्‍टर क्षेत्र घटले; 11 वर्षांचा तपशील

Goa Agriculture Report: गेल्‍या ११ वर्षांच्‍या काळात राज्‍यातील कृषी लागवडीखालील क्षेत्रात १,९२७ हेक्‍टरने घट झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गेल्‍या ११ वर्षांच्‍या काळात राज्‍यातील कृषी लागवडीखालील क्षेत्रात १,९२७ हेक्‍टरने घट झाली आहे. तर, भात लागवडीखालील क्षेत्र तब्‍बल १०,२०७ हेक्‍टरने घटले आहे. नियोजन, सांख्‍यिकी आणि मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

२०१३–१४ या वर्षात राज्‍यातील बारा तालुक्‍यांतील १,२९,२०६ हेक्‍टर जमीन कृषी लागवडीखाली होती. परंतु, २०२४–२५ या वर्षात हा आकडा १,२७,२७९ हेक्‍टर इतका झाला. त्‍यात डिचोली, सत्तरी, सांगे, धारबांदोडा, काणकोण, सासष्टी‍ आणि मुरगाव या तालुक्‍यातील क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी इतर तालुक्‍यांतील कृषी लागवडीखालील क्षेत्रात घट झाल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

दरम्‍यान, या ११ वर्षांच्‍या काळात भात लागवडीखालील क्षेत्रात १०,२०७ हेक्‍टरनी घट झाली. २०१३–१४ मध्‍ये बाराही तालुक्‍यांतील ४२,८२० हेक्‍टर जमीन भात लागवडीखाली होते. तर, २०२४–२५ मध्‍ये हा आकडा ३२,६१३ इतका झाल्‍याचेही अहवाल सांगतो.

गेल्या ११ वर्षात लागवड कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मजुरांची कमतरता आहे. बऱ्याच ठिकाणी जमिन असूनही ती कसली जात नाही. अनेक ठिकाणी पडीक जमिन टाकल्यामुळे भात किंवा अन्य पिके घेतली जात नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून कृषी लागवड व उत्पादनात घट होत आहे. युवा वर्गाने शेतीकडे लक्ष दिल्यास उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

कृषी लागवडीखालील क्षेत्र (हेक्‍टरमध्‍ये)

तालुका २०१३–१४ २०२४–२५

तिसवाडी १०,८०१ ९,५७४

बार्देश १५,८७२ १४,२४२

पेडणे १४,३०१ १४,२७५

डिचोली ११,१६८ ११,३५२

सत्तरी १४,१६६ १४,७८४

फोंडा १०,३९८ ९,९५३

सांगे १०,५०० १०,८८७

धारबांदोडा ३,३५९ ३,५६०

काणकोण ९,६४६ ९,७७६

केपे ९,९८१ ९,६१९

सासष्‍टी १६,६६६ १६,७८७

मुरगाव २,३४३ २,४७०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajasthan vs Goa womens T20: गोव्याच्या महिला संघाचा विजय, 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात राजस्थानला नमविले

Inspiring Story: विश्‍वविजेतेपदाची 'गंगा' आली अंगणी... सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील गंगा कदमची प्रकाशझोतातील कामगिरी

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

SCROLL FOR NEXT