गणेशोत्सव (Ganeshotsav) संपताच लोकांचा ओढा आता मांसाहारी पदार्थांकडे वळला आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: गणेशोत्सव संपताच चिकन, अंड्यांचे दर भडकले

राज्यातील बहुतांश शहरांमध्‍ये अंड्यांचे (Eggs) दर 5 रूपयांनी वाढले आहेत. परंतु, ग्रामीण भागात वाजवीपेक्षा अधिक दर वाढविण्यात आले असल्याच्या तक्रारी आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: पेट्रोल, (Petrol) डिझेल (diesel) आणि गॅस (Gas) सिलिंडरची दरवाढ झाल्याने अगोदरच सर्वसामन्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे ती चिकन (Chicken) आणि अंड्यांच्या (Eggs) दरवाढीची. गणेशोत्सव (Ganeshotsav) संपताच लोकांचा ओढा आता मांसाहारी पदार्थांकडे वळला आहे. त्यामुळेच सध्या मासळीचेही दर वाढलेलेच आहेत. शिवाय मासळीला (Fish) पर्याय असलेले चिकन आणि अंडीसुध्दा आता महागली आहेत.

राज्याला परराज्यांतून कोंबडी आणि अंड्यांचा पुरवठा नेहमीप्रमाणेच होत असताना स्थानिक व्यापाऱ्यांनी दर वाढविले आहेत. बाहेरच्या केवळ काहीच कंपन्यांनी कोंबडी आणि अंड्यांचे दर किरकोळ प्रमाणात वाढविले आहेत. परंतु, राज्यात चिकनच्या दरात तब्बल 30 ते 50 रुपयांनी तर अंड्यांच्या दरात प्रतिशेकडा 20 ते 30 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्‍यामुळे अंड्यांचा दर प्रतिशेकडा 500 रुपयांवर पोचला आहे. तर, चिकनचा दर 150 ते 179 रूपये प्रतिकिलो झाला आहे.

दरम्‍यान, राज्यातील बहुतांश शहरांमध्‍ये अंड्यांचे दर 5 रूपयांनी वाढले आहेत. परंतु, ग्रामीण भागात वाजवीपेक्षा अधिक दर वाढविण्यात आले असल्याच्या तक्रारी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT