The needy student of Shantadurg Vidyalaya was adopted by the Rotary Club Dainik Gomantak
गोवा

Goa: शांतादुर्ग विद्यालयाच्या गरजू विद्यार्थीनीला घेतले दत्तक

डिचोली रोटरी क्लबतर्फे (Rotary Club) डिचोलीतील श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या एक गरीब आणि गरजू विद्यार्थीनीला (student) दत्तक घेण्यात आले.

दैनिक गोमन्तक

डिचोली: शैक्षणिक, आरोग्य आदी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डिचोली रोटरी क्लबतर्फे डिचोलीतील श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या एक गरीब आणि गरजू विद्यार्थीनीला (Needy student) दत्तक घेण्यात आले. बुधवारी विद्यावर्धक मंडळ संचलित श्री शांतादुर्गा विद्यालयात आयोजित सोहळ्यात या विद्यार्थिनीला (student) दत्तक घेण्यात आले. पितृछत्र हरपलेल्या विदीक्षा विजय गावकर या विद्यार्थीनीला 'रोटरी' ने दत्तक (Adopted) घेतले आहे.

विदिक्षाला घेतले दत्तक

शांतादुर्गा विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विदीक्षा विजय गावकर या विद्यार्थीनीला रोटरी क्लबचे पदाधिकारी उमेश प्रभू यांनी दत्तक घेतले. तिच्या इयत्ता बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च उमेश प्रभू यांच्याकडून करण्यात येणार आहे. बुधवारी आयोजित कार्यक्रमात उमेश प्रभू यांच्याकडून सुरवातीचे अर्थसाहाय्य देण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदिन नायक, सचिव अमोल सावंत, उमेश प्रभू, संदेश बुर्ये, विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, खजिनदार राजेश धोंड, मंडळाच्या साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजत तेली मुख्याध्यापिका श्रद्धा आसकावकर, शिक्षिका यास्मिन शेट्ये आदी उपस्थित होते. विजय सरदेसाई यांनी रोटरीच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. श्रद्धा आसकावकर यांनी स्वागत केले. यास्मिन शेट्ये यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: अपघाताचे सत्र थांबेना! मुरगाव येथे भरधाव कारची दुचाकीला धडक, 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

Tamil Nadu Bus Crash: तामिळनाडूमध्ये दोन बसेसची समोरासमोर टक्कर, 11 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

Serendipity Arts Festival: बहुविध कलांचा मोठा महोत्सव! 'सेरेन्डिपिटी'साठी सजतेय पणजी; जगभरातील कलाकार-प्रेक्षक येणार एकत्र

Konkani Film Festival: काणकोण येथे रंगणार 'कोकणी चित्रपट महोत्सव'! कुठे कराल बुकिंग, काय आहेत तारखा; जाणून घ्या..

Illegal Cattle Transport: बेतोडा येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांची वाहतूक रोखली; तीन गुरांची सुटका

SCROLL FOR NEXT