Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात विकेंडला रक्ताचा सडा! वास्को, नानोडा आणि मंगेशीत भीषण अपघात; 1 ठार, तब्‍बल 18 जखमी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Goa Road Accidents Vasco Nanoda Mangeshi: वास्‍को, नानोडा आणि मंगेशी या तीन ठिकाणी शनिवार सायंकाळ ते रविवारी रात्रीपर्यंत झालेल्‍या तीन वेगवेगळ्‍या अपघातांत एकाचा मृत्‍यू झाला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: वास्‍को, नानोडा आणि मंगेशी या तीन ठिकाणी शनिवार सायंकाळ ते रविवारी रात्रीपर्यंत झालेल्‍या तीन वेगवेगळ्‍या अपघातांत एकाचा मृत्‍यू झाला. तर, तब्‍बल १८ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी वास्‍को येथील एका महिलेला (वय ५६ वर्षे) धडक देऊन भरधाव वेगात असलेल्‍या कारचालकाने तेथून पळ काढला.

परंतु, या घटनेची माहिती मिळताच आमदार आमोणकर यांनी आपल्‍या कारने १२ किमीपर्यंत संबंधित कारचा पाठलाग केला आणि चालक सचिन चोप्रा (रा. उज्जैन-मध्यप्रदेश) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्‍यान मृत्यू झाला. या घटनेमुळे वास्को आणि दाबोळी परिसरातून हळहळ व्यक्त करण्‍यात आहे.

हा अपघात होण्यापूर्वी संबंधित कार आमदार संकल्प आमोणकर यांच्या कारला ओव्हरटेक करून पुढे गेली होती. महिला अपघातग्रस्त होऊन जमिनीवर पडल्याचे पाहताच आमदार आमोणकर यांनी वेळ न दवडता अपघातास कारणीभूत कारचा पाठलाग सुरू केला. त्‍याचदरम्‍यान त्‍यांनी मुरगाव पोर्ट तसेच वास्को आणि दाबोळी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि बारा किलोमीटर अंतरावर कार अडवून चालकाला पकडून पोलिसांच्‍या स्वाधीन केले.

आमदार आमोणकर यांच्या धाडसामुळे संशयित चालक सचिन चोप्रा याला पळून जाण्याची संधी मिळाली नाही. तसेच पोलिसांनाही त्याला वेळेत अटक करणे शक्य झाले. वाहनचालक सचिनवर गुन्हा दाखल करण्‍यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे. मृत सिद्धम्मा मदार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्‍पितळात पाठवल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली.

दुसरा अपघात शनिवारी रात्री फोंडा- पणजी मार्गावरील मंगेशी येथे झाला. या अपघातात एका टेम्पो ट्रॅव्‍हलरची ट्रकला धडक बसल्यामुळे ट्रॅव्‍हलरमधील चौघेजण जखमी झाले. ही टेम्पो ट्रॅव्हलर म्हार्दोळहून कुंडईच्या दिशेने जात होती. मंगेशी येथे पोहोचल्यावर ट्रॅव्‍हलरच्‍या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्‍याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. त्‍यात ट्रॅव्‍हलरमधील सुधीर सुतार (वय ४० वर्षे) हे गंभीर जखमी झाले. त्याला तत्‍काळ गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले. तर नागराज हुंद्रे (वय २८ वर्षे), नितीन गौडा (वय २८ वर्षे) आणि शुभम कांबळे (वय २४ वर्षे) या किरकोळ जखमी झालेल्‍या तिघांना मडकई येथील आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्‍यात आले.

...अन् बसचे चाकच तुटले

तिसरा अपघात रविवारी सायंकाळी नानोडा येथे झाला. दोडामार्गच्‍या दिशेने जात असलेल्‍या प्रवासी बसला दोडामार्गहून अस्‍नोड्याच्‍या दिशेला जात असलेल्‍या थार जीपने समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की त्यामुळे बसचे पुढील चाकच तुटून पडले.

आमोणकरांनी केला कारचा पाठलाग

वास्‍कोतील घटना ‘हिट ॲॅण्ड रन’चा प्रकार असून, यात सिद्धम्मा मदार या महिलेचा मृत्‍यू झाला. या महिलेला धडक देऊन पळ काढणाऱ्या वाहनाचा १२ किमी पाठलाग करून आमदार संकल्‍प आमोणकर यांनी चालकाला पकडून पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले.

थार जीपचा चक्काचूर; चौघे प्रवासी बचावले

नानोडा येथील अपघातात १४ प्रवासी जखमी झाले. त्‍यातील तिघेजण गंभीर जखमी असून, त्‍यांना उपचारासाठी डिचोलीतील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्‍यात आले. दुसरीकडे अपघातात सापडलेल्‍या थार जीपच्‍या दर्शनी भागाचा चक्‍काचूर झाला. मात्र, त्‍यातील चौघेजण सुखरूप असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

थार चालक मद्याच्‍या नशेत?

नानोडा अपघातात सापडलेल्‍या थार जीपमधील चौघेजण सहलीसाठी गेले होते. तेथून परतत असताना समोरील वाहनाला ओव्‍हरटेक करण्‍याच्‍या नादात थारचालकाने समोरून येणाऱ्या बसला धडक दिली. यावेळी थारचालक मद्याच्‍या नशेत होता, अशी माहिती बसमधील प्रवाशांनी पोलिसांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E Tender Process: राज्यातील काही ग्रामपंचायतींकडून ई-निविदा नियम धाब्यावर; पाच लाखांवरील टेंडर पद्धतीत गैरव्यवहार

CWG 2026 मध्ये थरारक अपघात! हाय बारवरून थेट डोक्यावर कोसळला इंग्लंडचा खेळाडू; तातडीने रुग्णालयात दाखल VIDEO

Dharmendra Pradhan Resignation: लढा अजूनही कायम! दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कार्यकर्त्यांचा पणजीत आनंदोत्सव

Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

VIDEO: फलंदाजीत अपयश, पण गोलंदाजीत सुपरहिट! अभिषेक शर्माने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT